रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये या अभिनेत्यासोबत रोमँटिक सुट्टीवर? चाहत्यांकडून खूलासा

रश्मिका आणि विजय दोघेही मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय (Enjoy) करत असल्याचा दावा या कपलच्या (Couples) चाहत्यांकडून केला जात आहे.

Updated: Oct 9, 2022, 08:13 PM IST
रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये या अभिनेत्यासोबत रोमँटिक सुट्टीवर? चाहत्यांकडून खूलासा title=
Rashmika Mandanna on a romantic vacation with this actor in Maldives nz

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Viral Photo: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या अफेअरची बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीत चर्चा आहे. मात्र, या जोडप्याने आजपर्यंत त्यांच्या नात्याबद्दल (Relationship) कधीही खुलासा केलेला नाही. अलीकडेच दोघेही मालदीवमध्ये सुट्टीसाठी रवाना झाल्याच्या बातम्या (News) आल्या होत्या. हे दोन्ही तारे विमानतळावर वेगवेगळ्या गेट्समधून आत आले होते. 

या जोडप्याला त्यांचे नाते आणि सुट्टी गुप्त ठेवायची असेल, परंतु चाहत्यांच्या (Fans) नजरेतून  कुठे काहीही वाचू शकेल. रश्मिका आणि विजय दोघेही मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय (Enjoy) करत असल्याचा दावा या कपलच्या (Couples) चाहत्यांकडून केला जात आहे. (Rashmika Mandanna on a romantic vacation with this actor in Maldives nz)

आणखी वाचा - मातीच्या भांड्यातील जेवणाची चवच निराळी... पण हे देखील आहेत जबरदस्त फायदे

 

रश्मिकाने मालदीवमधून शेअर केलेल्या फोटोत चाहत्यांना सापडला पुरावा

रश्मिकाने अलीकडेच मालदीवमध्ये (Maldives) सुट्टीचा फोटो पोस्ट (Post) केला आहे. मंदाना त्या फोटोत एकटीच दिसत आहे. त्या फोटोत मंदाना एका Swimming pool जवळ बसलेली दिसत आहे. या फोटोत मंदानाने सनग्लासेस (Sunglasses) घातलेला आहे. रश्मिकाने या फोटोमध्ये जो सनग्लासेस घातला होता तेच सनग्लासेस विजय देवरकोंडा यांनी विमानतळावर मालदीवला रवाना होताना घातला असल्याचा दावा चाहत्यांकडून केला जात आहे. चाहत्यांच्या मते, रश्मिका मंदान्नाने फोटो क्लिक करण्यासाठी विजयकडून तिचा सनग्लासेस घेतला आहे. याचा अर्थ ते या सुट्टीचा आनंद एकत्र घेत आहेत.

या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदा गीता गोविंदम (Govindam) या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट (Blockbuster hit) ठरला. या चित्रपटानंतर त्यांनी डिअर कॉम्रेडमध्ये (Dear Comrade) स्क्रीन शेअर केली. या चित्रपटाला देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटापासूनच या दोघांच्या अफेअरच्या (affair) बातम्यांचा बोलबाला सुरु झाला. मात्र, विजय आणि रश्मिका या दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे की ते फक्त चांगले मित्र (Friends) आहेत.

आणखी वाचा - Optical Illusion: फक्त 1 टक्के लोकांनी शोधली या फोटोत लपलेली मांजर, पाहा तुम्हाला दिसतेय का?

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गुडबायमधून बॉलीवूडमध्ये रश्मिकाची एन्ट्री

रश्मिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल रश्मिका तिच्या मल्टीस्टारर चित्रपट गुडबायमध्ये (Goodbye) अमिताभ बच्चनसोबत (Amitabh Bachchan) दिसत आहे. गुडबायमध्ये रश्मिका त्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. हा एक इमोशनल कॉमेडी फॅमिली ड्रामा चित्रपट (movie) आहे. या चित्रपटातील रश्मिकाच्या पात्राची तुलना पीकू (Piku) चित्रपटात अमिताभ यांची मुलगी बनलेल्या दीपिका पदुकोणशीही (Deepika Padukone) केली जात आहे. या चित्रपटात ती नीना गुप्ता (Neena Gupta), सनी ग्रोवर (Sunny Grover) आणि अनेक बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसोबत दिसणार आहे.