Rashmika Mandanna's Ex-Boyfriend : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या 'एनिमल' या चित्रपटातील फस्ट लूक समोर आला होता. या चित्रपटात ती अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तिच्या कामासोबतच तिचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असतं. आता चर्चा अशी सुरु आहे की तिच्या एक्स बॉयफ्रेंड रक्षित शेट्टीनं खुलासा केला आहे. खरंतर त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. त्यानं सांगितलं की आजही त्याचं रश्मिकाशी बोलणं होतं.
रश्मिकाशी साखरपुडा मोडल्यानंतर रक्षितचं तिच्यासोबतचं नातं काही ठिक नव्हतं असं म्हटलं जात होतं. पण ही गोष्ट चुकिची आहे. रक्षितनं स्वत: सांगितलं की रश्मिका आणि तो कधी-कधी एकमेकांना मेसेज करत बोलताना दिसतात. दरम्यान, रश्मिका आणि रक्षित हे दोघे Kirik Party या चित्रपटा दरम्यान, एकमेकांना डेट करत होते. त्यांचा साखरपुडा 3 जुलै 2017 मध्ये झाली होती. त्यांचा साखरपुडा हा त्यांच्या गावी झाला होता. एकावर्षात 2018 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याला संपवलं.
रश्मिका आणि रक्षित यांचं लग्न मोडल्यानंतर यांच्यात कटूता निर्माण झाली असेल. पण हे खोट आहे. रक्षितनं स्वत: सांगितलं की ते दोघं कधी-कधी एकमेकांना मेसेज करून बोलतात. ते सतत एकमेकांशी बोलत नाहीत, पण जेव्हा पण माझा चित्रपट येतो तेव्हा ती मला शुभेच्छा देते. इतकंच नाही तर जेव्हा पण तिचा चित्रपट येतो तेव्हा मी तिला शुभेच्छा देतो. याशिवाय वाढदिवसाच्या दिवशी देखील एकमेकांना शुभेच्छा देतो. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, रश्मिका ही रक्षितसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती. मात्र, साखरपुड्याच्या एकावर्षात त्यांनी त्यांचं लग्न मोडलं.
रक्षितला रश्मिका आणि ऋषभ शेट्टीसोबत असलेल्या बॉन्डिंग विषयी प्रश्न विचारण्यात आला. रश्मिकानं ऋषभनं दिग्दर्शित केलेल्या 'किर्क पार्टी' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती ही रक्षितनं केली होती. त्यासोबत मुख्य अभिनेत्याची भूमिका देखील साकारली होती.
हेही वाचा : 'बॉईज 4' मधील टायटल सॉन्गमध्ये Robotics डान्स फॉर्म! प्रेक्षकांच्या वळल्या नजरा
दरम्यान, त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रक्षित शेट्टी सगळ्याच शेवटी Sapta Sagaradaache Ello – Side A या चित्रपटाच दिसला होता. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. तर चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून चांगला रिव्ह्यू आहे. तर रश्मिका लवकरच 'एनिमल' या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट यंदाच्या वर्षीच 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय 'पुष्पा 2' आणि 'रेनबो' चित्रपटात देखील दिसणार आहे.