'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना; नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल

या अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

Updated: Jan 18, 2023, 09:50 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करतेय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना; नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल  title=

मुंबई : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना  (Rashmika Mandanna) नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीची लव्हलाईफही खूप चर्चेत आहे. रश्मिकाने तिची बॉलिवूडमध्ये खास छाप सोडली आहे. आपल्या दमदार अभिनयाने रश्मिकाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पुष्पा द राइज (Pushpa The Rise) या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun)च्या अभिनयाचं खूप कौतुक केलं गेलं तर दुसरीकडे रश्मिका मंदान्नालादेखील खूप पसंती दर्शवली. 

तिच्या पुष्पा सिनेमातील अभिनयाचंही खूप कौतुक केलं गेलं. रश्मिका मंदान्ना हे दक्षिणेतील एक मोठं नाव आहे जिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडतं.  विशेषत: तिच्या लव्ह लाईफबद्दल, ज्याची खूप चर्चा होते. रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna Rashmika Mandanna Boyfriend pushpa fame dated vijay deverakonda) सध्या साऊथच्या राऊडीला ती डेट करत आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून विजय देवरकोंडा  (Vijay Deverakonda) आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. मात्र, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी अजून या बातमीवर दुजोरा दिलेला नाही.  
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे. मात्र या वृत्तांवर दोघंही मौन बाळगून आहेत. विजय देवरकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव आहे. विशेषतः अर्जुन रेड्डीनंतर तो सुपरहिट स्टार बनला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आधी रश्मिका आणि विजयचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघेही मालदीवमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. रश्मिका आणि विजयनं मालदीवमधील एकाच जागी उभा राहून हा फोटो काढल्याचे म्हटले जात आहे. कारण त्या दोघांच्या फोटोचं बॅकग्राऊंड एकसारखं आहे. 

बॉलिवूडमध्ये डेब्यू  
तसं, रश्मिका मंदन्नाने आता दक्षिण ते मुंबई प्रवास केला आहे. लवकरच ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचीही खूप चर्चा होत आहे. कारण शेरशाहनंतर सिद्धार्थ मल्होत्राकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत.