ब्लॅक ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट..ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

अभिनेत्री रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे.रश्मी देसाईने केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

Updated: May 3, 2022, 08:50 AM IST
ब्लॅक ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट..ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा title=

मुंबईः अभिनेत्री रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. हे फोटोशूट पाहून चाहत्यांना नजर हटवणंही कठीण झालं आहे. वयाच्या 36 व्या वर्षी रश्मी देसाईने केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे


काळ्या रंगाचा लाँग गाऊन परिधान केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री किलर पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये रश्मी देसाईने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्री इतकी सुंदर दिसत आहे की, हे फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. यासोबत तिने लाईट मेकअप आणि हाय हिल्स घालून लूक पूर्ण केला आहे.


या काळ्या ड्रेसमध्ये रश्मी देसाईच्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो रश्मी देसाईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.रश्मी देसाईने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर करण्यास सुरुवात केली.

रश्मी देसाईच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून फायर इमोजीचा पाऊस पडत आहे. चाहत्यांना रश्मी देसाईचा हा लूक खूपच पसंतीस पडत आहे.

रश्मी देसाईचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. वयाच्या 36 व्या वर्षीही रश्मीचा कातिलाना अंदाज या फोटोंमधून दिसत आहे.

रश्मी देसाईने अनेक टीव्ही सिरियल्समधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच बिग बॉसमधून रश्मीला प्रचंड प्रसिद्धी  मिळाली. रश्मी देसाई तिच्या खाजगी आयुष्याबाबतही नेहमी चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्यात बरेच चढ-उतार आले. अभिनेता नंदीश संधूबरोबर तिचा घटस्फोट झाला. अरहान खानला देखील ती डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र हिंदी 'बिग बॉस'नंतर हे दोघं विभक्त झाले.