आता कपिल देव यांच्यावर सिनेमा? 'हा' अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. अनेक प्लेअर्सच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहेत. आता क्रिकेटचे सुपरस्टार असलेले कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 24, 2017, 06:40 PM IST
आता कपिल देव यांच्यावर सिनेमा? 'हा' अभिनेता असणार मुख्य भूमिकेत title=
File Photo

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. अनेक प्लेअर्सच्या आयुष्यावर सिनेमे तयार झाले आहेत. आता क्रिकेटचे सुपरस्टार असलेले कपिल देव यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

मिल्खा सिंग, मेरी कोम, अझहरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आले आहेत. पण आता क्रिकेटचे सुपरस्टार अशी ओळख असलेल्या कपिल देव यांच्यावर सिनेमा बनविण्यात येत असल्याची तयारी सुरु झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक था टायगर, बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाईट सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करु शकतात.

आता प्रश्न आहे की, या सिनेमात कपिल देव यांची भूमिका करणार कोण? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंग करण्याची शक्यता आहे. या सिनेमासाठी आधी अर्जुन कपूरसोबत चर्चा झाली होती असेही म्हटले जात आहे. सूत्रांच्या मते, अभिनेता रणवीर सिंगने या सिनेमात काम करण्यासाठी होकारही दिला आहे.

दरम्यान, भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्रा याच्या आयुष्यावरही सिनेमा बायोपिक बनविण्याची तयारी सुरु झाली आहे. अभिनव बिंद्रा याच्या आयुष्यावर बनविण्यात येणाऱ्या या सिनेमात अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे.