मुंबई : अभिनेता रणवीर सिंग स्टारर '83' सिनेमा 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण चाहत्यांनी आताचं सिनेमागृहाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. ही बाब सिनेमातील कास्टसाठी आनंददायी आहे. '83' मुळे कलाकारांची लॉटरी लागेल असं म्हणायला काही हरकत नाही. '83' सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांनी एडवांस बुकिंग सुरू केली आहे. त्यामुळे हा सिनेमा किती रूपयांचा गल्ला जमा करेल हे पाहाणं महत्त्वातं ठरणार आहे.
'83' सिनेमाची आतापर्यंत 15 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी सिनेमा 10 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे. सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळच्या मुहूर्तावर सिनेमा तुफान कमाई करू शकतो..
'83' THIS FRIDAY: ADVANCE BOOKING BEGINS... Advance bookings for #83TheFilm have commenced... In #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada and #Malayalam... Also in #3D. pic.twitter.com/ElIF1ehZVh
— taran adarsh (@taran_adarsh) December 20, 2021
कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमी हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त, सिनेमात ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एमी विर्क आणि पंकज त्रिपाठी यांची महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.