भूमीच्या परवानगीशिवाय तिच्या टॉयलेटमध्ये गेला रणवीर सिंग आणि मग...

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथा रिलीज व्हायला फक्त दोनच दिवस बाकी आहेत. 

Updated: Aug 9, 2017, 04:39 PM IST
भूमीच्या परवानगीशिवाय तिच्या टॉयलेटमध्ये गेला रणवीर सिंग आणि मग...  title=

मुंबई : अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथा रिलीज व्हायला फक्त दोनच दिवस बाकी आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि भूमी व्यस्त आहेत. या दोघांबरोबरच अनेक बॉलीवूड अभिनेतेही चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. वरुण धवननं इंस्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचं प्रमोशन म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता.

आता रणवीर सिंगही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मैदानात उतरला आहे. या प्रमोशनचा एक व्हिडिओच त्यानं शेअर केला आहे. भूमी पेडणेकर फोनवर बोलत असताना तिला टॉयलेटमधून कोणाचा तरी आवाज येतो. आणि त्यानंतर रणवीर सिंग भूमीच्या टॉयलेटमधून बाहेर पडतो. देशामध्ये टॉयलेटची संख्या कमी असल्यामुळे मी तुझं टॉयलेट वापरल्याचं रणवीर या व्हिडिओमध्ये सांगत आहे.