मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयासोबतच लूक्समुळे देखील चर्चेत असते. आलियाचा कॅझ्युअल लूक चाहत्यांना पसंत आहे. आलिया कुठेही स्पॉट झाली तरी तिचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होतात. आलिया एअरपोर्टवर नुकतीच स्पॉट झाली. तेथील तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
या व्हिडीओत आलिया रणबीर कपूरची खूप आठवण काढत आहे असं दिसत आहे. आलिया एअरपोर्टवर सफेद रंगाच्या टॉपसोबत काळ्या रंगाचं जॅकेट आणि मॅचिंग पॅँट आणि शूज घालून दिसत आहे. यासोबतच तिने रणबीर कपूरची काळ्या रंगाची टोपी घातली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. रणबीरची आठवण येतेय का? असा प्रश्नही तिला विचारण्यात येत आहे.
नुकताच शेअर केलेला सेल्फी आलिया भट्टने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आठवण येत होती. ज्यानंतर तिने रणबीरची आठवण आली म्हणून कॅप घालून सेल्फी काढली. सोशल मीडियावर पण फोटो पोस्ट केले आहेत. तिने फोटो पोस्ट करत लिहिलं, जेव्हा तुम्ही त्याची आठवण काढता तेव्हा त्यांच्या गोष्टी चोरता. आणि त्याच्यासोबत सेल्फी क्लिक करतात.
आलिया सध्या रणवीर सिंगसोबत रॉकी और रिंकी की लव्ह स्टोरी या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. रणवीर आणि आलिया सोबत शबाना आझमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. अलीकडेच आलियाने चित्रपटाचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर करून शूटिंग सुरू करण्याविषयी माहिती दिली होती.