एअरपोर्टवर सगळ्यांसमोर रणवीरने Kiss करताच दीपिका पादुकोण भडकली आणि...

त्यांना एकत्र पाहून या दोघांनाही आपल्या

Updated: Dec 16, 2021, 05:55 PM IST
 एअरपोर्टवर सगळ्यांसमोर रणवीरने Kiss करताच दीपिका पादुकोण भडकली आणि... title=

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर सेलिब्रिटींचे स्पॉटिंग होणे ही काही नवीन गोष्ट नाही. ते कधी शहरात ये-जा करताना दिसतात, तर कधी विमानतळावर ते स्पॉट होतात. अशा परिस्थितीत बॉलीवूडमधील सर्वात आवडते जोडप्यांपैकी एक 'दीपवीर' म्हणजेच दीपिका आणि रणवीर देखील पहाटे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.

यावेळी, दीपिकाने ब्लॅक-व्हाईट रंगाचा स्कर्ट आणि स्वेट शर्ट घातला होता, तर रणवीर सिंगने पिवळ्या रंगाचा टायगर प्रिंट स्वेटर आणि लाल रंगाची पॅन्ट घातली होती. कपल त्यांच्या लॅम्बोर्गिनीमध्ये विमानतळावर पोहोचले होते, जिथे रणवीर धावत दीपिकाच्या कारचा दरवाजा उघडताना दिसला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांना एकत्र पाहून या दोघांनाही आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची फोटोग्राफर्समध्ये स्पर्धा लागली होती. मात्र, या जोडप्याने सर्वांना संधी दिली आणि पोझही दिली.

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा रणवीर सिंग जगासमोर आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसला. त्याने दीपिकाच्या गालावर किस केले आणि 'प्रोड्यूसर आहे माझी' असं ओरडून म्हणाला. दीपिका रणवीरचा रोमान्स पाहून फोटोग्राफर्स 'पुन्हा एकदा' म्हणाले, ज्यावर दीपिका हसते, पण नंतर त्यांना थांबवते. भडकून त्यांना 'हे' असं म्हणतं ओरडते.