दीपिकाच्या किसिंग सीनवर रणवीर सिंग जे म्हणाला, सगळेच हैरान

अशा परिस्थितीत आता रणवीर सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करून आपले मत व्यक्त केले आहे.

Updated: Jan 21, 2022, 04:52 PM IST
 दीपिकाच्या किसिंग सीनवर रणवीर सिंग जे म्हणाला, सगळेच हैरान title=

मुंबई : दीपिका पादुकोणचा 'गहराईयाँ' हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत.'गहराईयाँ'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना कळले आहे की, यात बरेच बोल्ड सीन्स पाहायला मिळणार आहेत.

विशेषतः दीपिका आणि सिद्धांत यांच्यातील लव्ह मेकिंग सीनची बरीच चर्चा आहे.अशा परिस्थितीत आता रणवीर सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करून आपले मत व्यक्त केले आहे.

'गहराईयाँ'चा ट्रेलर रिलीज झाल्याने तो चर्चेत आला आहे. यावर अनेक बॉलीवूड स्टार्सनी प्रतिक्रिया व्यक्त करत याचं वर्णन जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेलरवर कमेंट करणाऱ्या कलाकारांमध्ये आलिया भट्ट, झोया अख्तर, चंकी पांडे आणि शनाया कपूर यांचा समावेश आहे.

त्याचवेळी रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडिया पेजवर चित्रपटातील दीपिकाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले- ''मूडी, सेक्सी और इंटेंस, Domestic noir ? मला साईन अप करा माझे सर्व आवडते, शकुन बत्रा, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि नसीर द लिजेंड.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीरने सांगितली खास गोष्ट 

दीपिकाला टॅग करत रणवीर लिहितो, 'आणि माझी मुलगी Fazillion buxxx सारखी दिसते.' पोस्टवर कमेंट करताना अनन्या पांडेने लिहिले- 'तू माझी फेव्हरेट आहेस.' या पोस्टवर सिद्धांत चतुर्वेदी यांनी हार्ट इमोटिकॉन बनवला आहे.

तर त्याचवेळी Amazon Prime Video ने देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही या पोस्टच्या भावना समजू शकतो'