मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा 83 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. त्याआधी क्रिकेटर आणि सेलिब्रिटी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या चित्रपटाचं जंगी प्रमोशन केलं. रणवीर आणि दीपिका या प्रमोशनसाठी एकत्र दौरा करताना दिसले.
बूर्ज खलिफावर देखील 83 चं मोशन पोस्ट प्रदर्शित करण्यात आलं. आणि संपुर्ण टीमने हा क्षण एन्जॉय केला. मुंबईत मोठा प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी रणवीर आणि दीपिकाने आपल्या स्टाईलने सगळ्याचं लक्षवेधून घेतलं होतं. पण या संपुर्ण सोहळ्यातील एक फोटो सर्वात जास्त चर्चेत आहे. तो म्हणजे माजी क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा...
भारतीय क्रिकेट टीमने 25 जून 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. भारतीय टीमच्या या ऐतिहास कामगिरीवर आधारित ‘83’ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यावेळच्या क्रिकेट टीमचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग साकारत आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलाये. त्याआधी सेलिब्रेटी आणि मीडियासाठी या चित्रपटाचं स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. 1983 चा विश्वषचक विजेता कर्णधार कपिल देवही यावेळी आवर्जुन उपस्थित होते. यावेळी रणवीर सिंग याने कपिल देव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रणवीर सिंग आणि कपिल देव एकमेकांना किस करताना दिसले.
या फोटोवरुन रणवीर सिंग आणि कपिल देव यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. कपिल देव हे भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.
त्यात आता या फोटोवरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. दीपिकाची या फोटोवर हटके प्रतिक्रिया मीम्सच्या माध्यमातून समोर आली आहे. रणवीर आणि कपिल देव यांचा किस करतानाचा फोटो व्हायरल होताच दीपिका म्हणते, " तुझ्या ह्या असल्या स्वभावाचा लई वैताग यायला मला..."
हे आणि असे अनेक मीम्स सध्या प्रेक्षकांचं लक्षवेधून घेत आहेत.