मुंबई : अभिनेते आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावत असतात, पण रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या अदभूत स्टाईलसाठी देखील खूप चर्चेत असतो. रणवीर त्याच्या रील आणि विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या (Deepika Padukone) घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. ज्यामुळे रणवीर प्रचंड आनंदी आहे. रणवीर-दीपिकाच्या घरात नवी पाहुणी म्हटल्यानंतर तुम्हाला देखील प्रचंड आनंद झाला असेल. (Happiness of ranveer singh)
त्यामुळे रणवीर आणि दीपिकाच्या घरी कोण आलं आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच... तर रणवीरने पुन्हा एक महागडी कार खरेदी केली आहे. सध्या रणवीर आणि त्याच्या नव्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Ranveer Singh car collection)
रणवीर सिंगचा त्याच्या नवीन कारसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. रणवीरने तब्बल 40 कोटी रुपयांची रिफर्बिश्ड एक्वा ब्लू एस्टन कार खरेदी केली आहे. (ranveer singh new car lamborghini)
अभिनेता म्हणाला, 'लॅम्बोर्गिनीची मालकी माझ्या बकेट लिस्टमध्ये होती. मी पहिल्यांदा 2014 मध्ये लॅम्बोर्गिनी शोरूममध्ये गेलो होतो. त्यानंतर मी ती विकत घेण्यासाठी सहा वर्षे प्रतीक्षा केली. त्यामुळे जेव्हा मी ती विकत घेतली तेव्हा तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.' (Ranveer-Deepika welcome new member in family)
रिफर्बिश्ड एक्वा ब्लू एस्टन शिवाय अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. रणवीरकडे Lamborghini Urus आणि Aston Martin पासून Mercedes-Benz GLS 350d आणि Mercedes-Benz GLS 350d कार आहेत. अभिनेत्याला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे.