छट पूजेसाठी Ranu Mondal चं गाणं रिलीज, पण काही मिनिटांतच सगळ्यांना बसला धक्का?

देशभरात छठची तयारी सुरू झाली आहे. बिहार, झारखंडसह काही राज्यांमध्ये हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Updated: Nov 6, 2021, 05:03 PM IST
 छट पूजेसाठी Ranu Mondal चं गाणं रिलीज, पण काही मिनिटांतच सगळ्यांना बसला धक्का? title=

मुंबई : देशभरात छठची तयारी सुरू झाली आहे. बिहार, झारखंडसह काही राज्यांमध्ये हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पूजेत सूर्याला अर्घ्य अर्पण करून षष्ठी मातेची पूजा केली जाते. दरवर्षी छठ पूजेच्या निमित्ताने भोजपुरी गायक त्यांची नवीन गाणी रिलीज करतात. पवन सिंह, खेसारी लाल यादव, अक्षरा सिंह, शारदा सिन्हा यांनी छठ गाणे गायले आहे पण आता रानू मंडननेही 'छठ मैया हे' गाणे गायले आहे.

राणू मंडलच्या नावाने प्रसारित होणारे हे गाणे यूट्यूबवर चांगलेच व्हायरल होत आहे. हे गाणे राणू मंडलने गायले नसले तरी तिच्या नावाने ते सोशल मीडियावर फिरत आहे. हे गाणे आतापर्यंत 9 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. गाण्यात रानू मंडल सूर्याला वंदन करताना दिसत आहे.

मात्र, कमेंटमध्ये अनेक युजर्सनी हा रानू मंडलचा आवाज नसल्याचेही म्हटले आहे. एका युजरने लिहिले - फक्त लाईक्स आणि कमेंटसाठी रानू मंडलचे नाव लिहिणे योग्य नाही.

ranu mondal

या व्हिडिओवरून लोक रानू मंडलला ट्रोल करण्यात मग्न आहेत. रानू मंडलला अनेक लोक सांगत आहेत की आता ती परत येऊ शकत नाही.