Ranbir Kapoor चा पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत खासगी फोटो लीक...

मुंबई नाही तर या ठिकाणी अभिनेत्रीसोबत रणबीरची भेट, खासगी फोटो लीक झाल्यानंतर कुटुंबाची प्रतिक्रिया   

Updated: May 2, 2022, 09:52 AM IST
Ranbir Kapoor चा पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत खासगी फोटो लीक...  title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरने 14 एप्रिल रोजी अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केलं. 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. आलिया भट्टसोबत लग्न करण्याआधी रणबीरचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अफेअर होतं. सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रणबीरचे काही फोटो लीक झाले. ज्यामुळे एकचं खळबळ माजली आहे. 

रणबीरसोबत फोटोमध्ये असलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) आहे.  माहिराने 'रईस’ सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं.  अभिनेत्रीने पाकिस्तानच्या प्रेक्षकांना एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत. तिच्या सिनेमांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. 

पण जेव्हा रणबीर कपूरसोबतचे तिचे काही फोटो व्हायरल झाले तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली. माहिरा खान न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूरसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. 

Ranbir Kapoor With Mahira: पाकिस्तानी एक्ट्रेस के साथ रणबीर की फोटो हुई लीक, पिता ऋषि कपूर ने कही थी ये बात

फोटोंमध्ये दोघेही सिगारेट ओढताना दिसत होते. हा फोटो समोर येताच लोक रणबीर आणि माहिरा यांच्या नात्याबद्दल अंदाज लावू लागले. पण रणबीर-माहिराच्या फोटो आणि नात्याबद्दल दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली. 

ते म्हणाले, 'अद्याप रणबीरचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे तो कोणासोबत फिरू शकतो. याचा अर्थ असा होत नाही, की तो कोणाला डेट करत आहे. जर त्यांच्यामध्ये प्रेम संबंध असते तर मुंबईत सर्वांना कळालं असतं....' असं ऋषी कपूर म्हणाले होते.