अरेच्चा इतक्या लवकर? लग्नानंतर काही दिवसात रणबीरच्या हातात दिसलं बाळ

रणबीरच्या हातात गोंडस बाळ दिसल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण, अनेकांनी विचारलं ज्युनियर कपूर का?   

Updated: May 27, 2022, 08:32 AM IST
अरेच्चा इतक्या लवकर? लग्नानंतर काही दिवसात रणबीरच्या हातात दिसलं बाळ title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्न करण्याचा विचार केला आहे. अत्यंत गुपित ठेवण्यात आलेलं हे लग्न अखेर 14 एप्रिल रोजी पार पडलं. लग्नानंतर आलिया आणि रणबीरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर काही दिवसांतचं त्यांनी कामाला देखील सुरुवात केली. याचदरम्यान रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रणबीरच्या या व्हिडीओवर अनेकांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

व्हिडीओमध्ये रणबीर एका गोंडस बाळाला खेळवताना दिसत आहे. रणबीर ज्याप्रमाणे त्या गोंडस बाळाला खेळवत आहे, ते पाहून रणबीर एक योग्य वडील होऊ शकतो... असा अंदाज अभिनेत्याचा प्रत्येक चाहता वर्तवत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हारयल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणबीरसोबत असणारा ते बाळ कोणाचं आहे? रणबीर नक्की कोणत्या ठिकाणी आहे? ही माहिती मिळू शकलेली नाही. पण रणबीरचा व्हिडीओ पाहून चाहते आलियाल टॅग करत आहेत. 

दरम्यान, रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर आता चाहते ज्युनियर कपूर कधी येणार असा प्रश्न जोडप्याला प्रश्न विचारत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीरचा हा व्हिडिओ मुलाच्या पालकांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.