रणबीर कपूरचे व्हायरल होणारे हे फोटो जणू संजय दत्तचा कार्बन कॉपी लूकच !

बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय रणबीर कपूर 'संजय दत्त' च्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी सज्ज होत आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 26, 2017, 10:12 AM IST
रणबीर कपूरचे व्हायरल होणारे हे फोटो जणू संजय दत्तचा कार्बन कॉपी लूकच !  title=
छायाचित्र सौजन्य - बॉलिवूडलाईफ.कॉम

मुंबई : बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय रणबीर कपूर 'संजय दत्त' च्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी सज्ज होत आहे. 

संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीरने त्यांच्या लूकमध्ये, चालण्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये तसेच शरीरावरही मेहनत घेतली आहे. सध्या रणवीर संजय दत्तप्रमाणेच फ्रेंच बिअर्डमध्ये दिसत आहे. बांद्रा येथील एका अपार्टमेंट रणवीरचा हा खास लूक क्लिक करण्यात आला आहे.  

व्हायरल फोटो जणू कार्बन कॉपी 

रणबीर कपूरचे फ्रेंच बिअर्डमधील रात्रीच्या वेळेस क्लिक केलेले फोटो जणू त्याची कार्बन कॉपीप्रमाणे वाटत आहेत. 

छायाचित्र सौजन्य - बॉलिवूडलाईफ.कॉम 

संजय दत्तलाही वाटले नवल ! 

रणबीर कपूर या आगामी भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत  आहे. जेव्हा पहिल्यांदा संजय दत्तने रणवीरचा फोटो पाहिला होता तेव्हा खुद्द संजय दत्तलाही फोटो पाहून नवल वाटले होते. आपण पाहत असलेला फोटो आपला नसून रणबीरचा आहे हे ओळखण्यासाठी संजय दत्तलाही थोडा वेळ लागला होता. 

राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.