Kangana Ranaut Said No To Ranbir Kapoor : खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या 'एमरजेन्सी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान, एका मुलाखतीत तिने बॅालिवूडमधल्या घराणेशाहीविषयी बोलत असताना रणबीर कपूर आणि आलिया भट्टला केंद्रस्थानी ठेवलं. इतकंच नाही तर तिनं रणबीरच्या 'अॅनिमल' चित्रपटावर खोचक टीका देखील केली. मात्र, सगळ्यांचं लक्ष कोणत्या गोष्टीनं वेधलं असेल तर ते म्हणजे तिला स्वत: रणबीरनं तिला एका चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं असता तिने ती ऑफर नाकारल्याचं सांगितलं.
कंगनानं ही मुलाखत सिद्धार्थ कननला दिली आहे. या मुलाखतीत कंगनानं असं सांगितलं की अशा लोकांशी बोलायला विचित्र वाटतं ज्यांना मी कामासाठी कधी नकार दिला आहे. असं असलं तरी देखील त्यांचा प्रोफेश्नल इक्वेशनवर काहीही परिणाम होत नाही.
या विषयीचं एक उदाहरण देत कंगनानं रणबीर कपूरचा उल्लेख केला. त्यावेळी कंगना म्हणाली की रणबीर कपूरने स्वत: तिच्या घरी जाऊन तू संजू चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. लक्षवेधी गोष्ट म्हणजे कंगनानं त्याला थेट नकार दिला होता. सविस्तर सांगत कंगना म्हणाली, 'रणबीर स्वत: माझ्या घरी आला होता आणि त्यावेळी त्यानं मला विनंती केली की संजूमध्ये एक भूमिका साकारशील का? मात्र, मी तो चित्रपट केला नाही. याचा अर्थ हा नाही की त्या नकाराचा त्यांच्या कामावर परिणाम झाला.' दरम्यान, तिला या चित्रपटामध्ये कोणत्या भूमिकेसाठी विचारलं गेलं याविषयी कंगनानं कोणताही खुलासा केला नाही.
'संजू' चित्रपटासोबतच तिने अजूनही काही चित्रपट नाकारलेत. यामध्ये सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' आणि 'सुलतान' या चित्रपटांचादेखील समावेश आहे.
हेही वाचा : अनंत-राधिकाच्या लग्नात का गेली नाहीस? कंगना रणौतनं महिन्याभरानंतर केला मोठा खुलासा, 'त्यानं स्वत:...'
कंगनाचा नवा चित्रपट 'एमरजेन्सी' हा 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राजकारणावर आधारित हा चित्रपट स्वत: कंगनाने दिग्दर्शित केला असून ती या चित्रपटात दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत, श्रेयस तळपदे हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत तर महिमा चौधरी पुपुर जयाकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगना तिच्या या चित्रपटासाठी खूपच उत्साही आहे. कंगना सगळ्यात शेवटी 'तेजस' या चित्रपटात दिसली होती.