रणबीर कपूरला झालंय तरी काय, ED समन्सनंतर वागणुकीत बदल... पापाराझींवर भडकला

Ranbir Kapoor Video: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ माजली आहे. ED चं समन्स आल्यामुळे आता बॉलिवूडच्या कलाकारांवर वेगळी कुऱ्हाड पडली आहे. यावेळी रणबीर कपूरचा पहिला व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यात तुम्हाला त्याचा अॅटिट्युड बदललेला दिसेलच. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 7, 2023, 08:42 PM IST
रणबीर कपूरला झालंय तरी काय, ED समन्सनंतर वागणुकीत बदल... पापाराझींवर भडकला title=
ranbir kapoor behaviour changes as he looks arrogant in front of photographers after the ed summoned

Ranbir Kapoor Video: हल्ली बॉलिवूड म्हटलं की काहीतरी सनसनाटी ही आलीच. त्यातून सध्या महादेव बेटिंग अॅप प्रकरणावर बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार हे ED च्या रडारवर आले आहेत. त्यामुळे सध्या या कलाकारांची जोरात चर्चा आहे. श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर, हिना खान, हुमा कुरेशी यांनी ED चे समन्स आलेले आहे. त्यामुळे या कलाकारांची चिंता वाढली आहे. आता याबाबत पुढील चौकशीला वेग आला आहे. रणबीर कपूरलाही दोन दिवसांपुर्वी ED कडून समन्स बजावण्यात आले आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात त्यांनी हे समन्स बजावले आहे. त्यामुळे याची आता जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आता कपूर राजपूत्र रणबीर कपूरचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरच्या बदललेल्या लूककडे पाहून सगळेच अवाक झाले आहेत. 

मानव मंगलानी या पापाराझी पेजनं सध्या एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात रणबीर कपूरचा 'आगाऊ'पणा स्पष्ट दिसून येतो आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की यावेळी या नक्की काय घडलंय. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या या व्हिडीओची. या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की रणबीर कपूर गाडीतून उतरतं आहे. सोबतच त्याच्यासमोरच पापाराझी उभे आहेत. त्यातून यावेळी त्याचा फोटो काढण्यासाठी ते पुढे येतात परंतु त्यांच्याकडे रणबीर पुर्णपणे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्यावर भडकतो. सोबत आत येऊ नकोस, इथेच उभा राहा, अशी तंबीही देताना दिसतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडीओमुळे नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. त्याचा हा वागणुकीतला बदल पाहून सगळेच वैतागले आहेत. 

हेही वाचा : 'मेरा पिया घर आया' गाण्यावर आता सनी लिओनीचे ठुमके, माधुरी दीक्षित म्हणते...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर कपूर एका क्लिनिकमध्ये जाताना दिसतो आहे. त्यानं फारच कॅज्युअल लुक केला आहे. यावेळी त्याच्या या वागणुकीवर नेटकरी कमेंट करत आहे. तो पापराझींशी उद्धटपणे बोलतो आणि रागारागात आत जातो त्यामुळे त्याच्या या वागणूकीवर चाहते निराश आहेत. अनेकांनी ED शीच त्याची तुलना केली आहे. रणबीर कपूरची आता चौकशी सुरू होईल. त्यातून त्यानं या अॅपमधून बक्कळ पैसा गैरमार्गानं कमावला असल्याचं समजते आहे. आता याची चौकशी होईल. यावेळी अनेक सेलिब्रेटी यात अडकले आहेत.