Animal चित्रपटाने मिटवली बाप-लेकाची नाराजी, Video वर आल्या भन्नाट प्रतिक्रिया

Animal Movie Impact On Father And Son: रणबीर कपूरचा अॅनिमल सध्या चांगलाच गाजतोय. पण आणखी एका घटनेमुळं अॅनिमलची चर्चा रंगली आहे. तर, या चित्रपटामुळं बाप-मुलाच्या नात्यातील दीड वर्षांचा दुरावा मिटला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 11, 2023, 12:58 PM IST
Animal चित्रपटाने मिटवली बाप-लेकाची नाराजी, Video वर आल्या भन्नाट प्रतिक्रिया title=
Ranbir Kapoor And Anil Kapoor Movie Animal Impact Father Son Settlement In Real Life

Animal Movie Impact On Father And Son: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) मुख्य भुमिका असलेल्या अॅनिमलची क्रेझ काही संपताना दिसत नाहीये. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजत आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने 700 कोटींचा गल्ला जमावला आहे. तर, सोशल मीडियावरही सिनेमातील काही सिन्स तुफान व्हायरल झाले आहेत. मात्र, आता अॅनिमल चित्रपटाचा प्रभाव खऱ्या आयुष्यातही होताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओनुसार, अॅनिमल चित्रपट पाहून आल्यानंतर वडिल आणि मुलांमधील दुरावा मिटला आहे, असा दावा करण्यात येत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. (Animal Movie Impact On Father And Son Video Viral)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Viralbhayani नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तर, या व्हिडिओच्या खाली एक  कॅप्शनही देण्यात आली आहे. संदीर रेड्डी वांगा यांच्या चित्रपटाचा असा असतो प्रभाव, असं यात सांगण्यात आलं आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 13 हजार जणांनी लाइक केला आहे. तर, तर, या व्हिडिओवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

बाप-मुलामधील दुरावा मिटला 

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या वडिलांच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर त्याचे वडिलही त्याला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत. यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी दाटलेले दिसत आहे. व्हिडिओनुसार, दीड वर्षांचा दुरावा मिटला असून बाप आणि मुलगा दोघंही अखेर एकमेकांना भेटले आहेत. एकमेकांना भेटून दोघांनाही भावना अनावर झाल्या आहेत. अॅनिमल चित्रपटामुळंच दोघांमधील दुरावा मिटला असल्याचा दावा केला जात आहे. 

रिअल लाइफमध्ये अ‍ॅनिमल

रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटातही बाप-मुलाच्या नात्याचे चित्रण दाखवण्यात आले आहे. चित्रपटात रणबीर मुलाची भूमिका साकारत आहे तर अनिल कपूर वडिलांची भूमिका. वडिलांचे प्रेम मिळवण्यासाठी रणबीर कपूर हरतर्हेचे प्रयत्न करताना दिसणार आहे. वडिलांचा आनंद आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. चित्रपटाची हिच कथा आता रियल लाइफमध्येही पाहायला मिळते. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्याव्यतिरिक्त रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी सारखे कलाकार आहेत.  

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, काहीही, पहिल्यांदा पुन्हा एकदा तुझ्या वडिलांसोबत चित्रपट बघ. पुन्हा नाते तुटेल. तर, एका युजरने म्हटलं आहे की, जर मी माझ्या वडिलांना चित्रपट पाहायला घेऊन गेले तर ते दीड वर्ष माझ्याशी बोलले नसते. तर, एकाने म्हटलं आहे की, आता वडिलांना बागबान दाखव.