मुंबई : दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग हे स्टार्स लवकरच एका प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमासाठी नाही तर वर्ल्ड टूरसाठी. यासाठी बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्संना म्हणजे दीपिका, रणवीर, अनुष्का. रणबीर आणि जॅकलिन फर्नांडिस यांना अप्रोच करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या सगळ्या स्टार्सचे एकत्रित असे हे पहिलेच प्रोजेक्ट आहे. पण याची निश्चित तारीख ठरवण्यात आलेली नाही. याचा संपूर्ण प्लॅन तयार असून आयोजक या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे ड्रिम प्रोजेक्ट करण्याचा विचार करत आहेत. कारण या सगळ्या स्टार्सच्या तारखा जुळून येणे मोठे दिव्यच आहे.
सुत्रांनी सांगितले की, स्टार्सच्या वर्ल्ड टूरची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही आमिर खान आणि सलमान खान यांनी वर्ल्ड टूर केलेली आहे. सोशल मीडियाचे प्रस्थ नव्हते तेव्हा स्टेज शोच्या माध्यमातूनच स्टार्स जगभरातील चाहत्यांशी कनेक्ट होत होते.
यापूर्वी वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ, परिणीती चोप्रा, आदित्य रॉय कपूर यांनी अमेरिकेत एकत्र स्टेज शो सिरीज केली होती. तर सलमान खानही सध्या कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, मनीष पॉल, डेझी शहा हे स्टार्स एकत्रितपणे द-बॅंग वर्ल्ड टूर करत आहेत.
Aa rahein hain hum.. swag ke saath !#DabanggReloaded @DabanggTour2018 @ZEEAmericas @sahilpromotions @beingbhav @theJAEvents @SohailKhan #jaevents #sohailkhanenetertainment pic.twitter.com/scuztsQR7W
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 16, 2018