लग्नानंतर आलियासोबत नाही तर तिच्या मैत्रिणींसोबत व्यस्त आहे रणबीर; पाहा फोटो

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Apr 19, 2022, 04:13 PM IST
लग्नानंतर आलियासोबत नाही तर तिच्या मैत्रिणींसोबत व्यस्त आहे रणबीर; पाहा फोटो title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या नवविवाहित जोडप्याचे फोटो पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहेत. दरम्यान, रणबीर कपूरचे असे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो आलियाच्या मैत्रिणींसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.

रणबीरचे फोटो व्हायरल
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. कधी संगीत तर कधी मेहंदीचे फोटो लोकांचं लक्ष वेधून घेण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाशी संबंधित अनेक नवं-नवीन फोटो देखील खूप व्हायरल होत आहेत.

लग्नाच्या या खास प्रसंगी रणबीर कपूरने आलियाच्या मैत्रिणींसोबत वन टू वन पोज देण्याची एकही संधी सोडली नाही. एका फोटोमध्ये आलियाचे फ्रेंड्स रणबीरला काहीतरी गिफ्ट देताना दिसत होते. रणबीर कपूर त्याच्या एका फोटोमध्ये आलिया भट्टच्या मैत्रिणींमध्ये बसलेला दिसतोय.  इतकंच नाही तर तो त्यांच्यासोबत  शॅम्पेनचा आनंददेखील घेताना दिसत आहे. 

लग्नाशी संबंधित एका फोटोमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनेत्रीच्या वधूसोबत पोज देताना दिसले. फोटोतील प्रत्येकाची स्टाईल पाहण्यासारखी होती. रणबीर आलियाच्या लग्नात अभिनेत्रीच्या मैत्रिणींही रंग भरण्याची एकही संधी सोडली नाही. आलियाच्या मैत्रिणींनी रणबीरसोबतच त्यांनी आलियासोबतही खूप मस्ती केली.