मुंबई : प्रभास आणि राणा दग्गुभट्टी या जोडगोळीचा ऑन स्क्रीन संघर्ष पाहण्यासाठी अनेकांनी सिनेमागृहांच्या बाहेर रांगा लावल्या होत्या.
बाहुबलीच्या दोन्ही भागांना रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला. देशा परदेशात या चित्रपटाने तुफान कमाईदेखील केली.
बाहुबलीमध्ये अभिनेता प्रभासने अमरेंद्र बाहुबली तर राणाने भैलालदेवची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये एकमेकांविरोधात हे दोघे उभे असले तरीही ऑफस्क्रीन त्यांची खूपच घट्ट मैत्री आहे.
इंस्टाग्रामवर राणा दग्गूभट्टी याने एक खास फोटो शेअर केला आहे. हा ऑनस्क्रीन फोटो शेअर करताना 'महिष्मती राज्याची' आठवण येत असल्याची खंत त्याने बोलून दाखवली आहे.
अमरेंद्र बाहुबली आणि भैलालदेव हे दोघे चुलत भाऊ असून एका राज्यावर अधिकार गाजवण्यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष चित्रपटामधून रंगवण्यात आला आहे.
बाहुबलीमध्ये दोन भावंडांमधील संघर्षाप्रमाणे एक प्रेमकथाही दडली होती. बाहूबली, भल्लालदेव प्रमाणेच देवसेना, कटप्पा, शिवगामी ही पात्र देखील खूप प्रसिद्ध झाली होती.
बाहुबली - द कन्क्लुजन या चित्रपटाने बॉक्सऑफिवर १५०० करोडची कमाई केली होती. इतकी दमदार कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे.