Katrina Kaif च्या सासूसारखी कोणीच नाही; कॅटला प्रेमाने म्हणते...

सासू असावी तर अशी... Katrina Kaif ला सासू प्रेमाने या नावाने हाक तर मारतेच, पण पराठे देखील भरवते  

Updated: Oct 29, 2022, 03:54 PM IST
Katrina Kaif च्या सासूसारखी कोणीच नाही; कॅटला प्रेमाने म्हणते...  title=

Katrina Kaif and Mother in Law : गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये, अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, दोघांनीही आपलं नातं गुपित कसं ठेवलं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. लग्नाआधी नातं आणि त्यानंतर कोणतीही कल्पना न देता विकी आणि कतरिना यांनी ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न गाठ बांधली. आता कतरिना आणि विकी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल पैकी एक आहे. (katrina kaif family with parents)

विकी आणि कतरिना यांच्या नात्याबद्दल त्यांच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. पण कतरिनाचं तिच्या सासू-सासऱ्यांसोबत नातं कसं आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. नुकताच कतरिनाने विनोदवीर कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये सासू-सासऱ्यांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. (katrina kaif mother in law)

कतरिना कैफ म्हणाली, विकी कौशलची आई वीणा कौशल (vina Kaushal) माझ्याठी रताळे बनवते, कारण ते माझ्या आहारात आहे.' एवढंच नाही तर, फिटनेस फ्रीकही कतरिनाला सासू पराठा देखील खायला सांगते.

पण कतरिनाच्या डाएटमध्ये पराठा नसल्यामुळे सासूने आपल्यासाठी पराठा केल्यामुळे कतरिना त्यातला थोडा तुकडा खाते. पुढे कतरिना म्हणाली, 'आता आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे माझ्या सासूला माझ्याबद्दल सर्व काही माहिती झालं आहे..'

सासूबाईंबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, 'त्या मला रोज रताळे खाऊ घालतात. शिवाय मला घरात प्रेमाने 'किट्टो' म्हणून हाक मारतात.' विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला. 

लग्नाआधी दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. कतरिना आणि विकीने लग्नापूर्वी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं. लग्नानंतर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलू लागले. (katrina kaif in laws house)