Ponniyin Selvan OTT Release : पोन्नियन सेल्वन 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीज, मोजावे लागतील 'इतके' पैसे

खरंच की काय? फक्त इतक्या रूपयात पाहता येणार Ponniyin Selvan,किंमत एकूण बसेल आश्चर्यांचा धक्का

Updated: Oct 29, 2022, 03:27 PM IST
Ponniyin Selvan OTT Release : पोन्नियन सेल्वन 'या' दिवशी होणार ओटीटीवर रिलीज, मोजावे लागतील 'इतके' पैसे  title=

मुंबई : दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 1 (Ponniyin Selvan) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रत्येक भाषेत चांगला गल्ला कमवला आहे. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज (OTT Release) होण्याच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नाही ते आता OTT वर घरबसल्या हा चित्रपट पाहू शकणार आहेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मवर किती रूपयात हा सिनेमा पाहता येणार आहे, हे जाणून घेऊयात.

चोल साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पोन्नियन सेल्वनमध्ये (Ponniyin Selvan) दाखवण्यात आला आहे. त्यामुळे गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार पोन्नियन सेल्वन 1 आता अॅमेझॉन (Amazon) प्राइमवर उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट सध्या तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रसारित केला जाणार आहे. तर अद्याप OTT वर हिंदीत प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे हिंदीत सिनेमा पाहणाऱ्यांची निराशा होणार आहे. 

किती रूपयात चित्रपट पाहता येणार? 

पोन्नियन सेल्वन (Ponniyin Selvan) Amazon Prime Rental वर रिलीज होणार आहे. तर ओटीटी प्लॅटफॉर्मने (OTT Platform) सूचित केले आहे की, पोन्नियन सेल्वन सर्व Amazon प्राइम सदस्यांसाठी 4 नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. दरम्यान ओटीटीवर हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना 199 रुपये मोजावे लागणार आहेत. 

किती कमाई केली? 

पोन्नियन सेल्वन 1 (Ponniyin Selvan) ने जगभरात 480 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. पोन्नियन सेल्वन 1 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

पोन्नियन सेल्वन 1 (Ponniyin Selvan) चित्रपटगृहात 30 संप्टेबर रोजी रिलीज झाला होता. चित्रपटगृहात रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर ही फिल्म ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटगृहात बक्कळ कमाई केल्यानंतर आता मेकर्स ओटीटीवर भरघोस कमाई करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान पीएस-१ मध्ये विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय बच्चन, ऐश्वर्या लक्ष्मी, जयम रवी, त्रिषा, प्रकाश राज, पार्थिवन आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.