Rakhi Sawant पुन्हा एकदा अडकली विवाहाच्या बंधनात; फोटो आले समोर...

ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतबाबत सध्या अनेक बातम्या येत आहेत.

Updated: Jan 11, 2023, 06:56 PM IST
Rakhi Sawant पुन्हा एकदा अडकली विवाहाच्या बंधनात; फोटो आले समोर... title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी राखीने खुलासा केला होता की, ती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. अनेकदा राखी आणि आदिलला एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, खुद्द राखीने देखील आदिलसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या राखीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफन व्हायरल होत आहे.  

ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतबाबत सध्या अनेक बातम्या येत आहेत. या दोघांची जोडी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. राखी आणि आदिलचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघंही एकमेकांवर खुल्लम-खुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण राखीने तिच्या नात्याला एक नवं नाव दिल्याचं दिसतंय. 

दरम्यान, राखीने पुन्हा एकदा लग्न केल्याची आणि यावेळी आदिलला तिचा जोडीदार बनवल्याची बातमी समोर येत आहे. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी जगाच्या नजरेपासून लपून गुपचूप लग्नगाठ बांधली. या जोडप्याने कोर्ट मॅरेज केलं असून कोर्ट मॅरेजनंतर दोघांचा पहिला फोटोही समोर आला आहे ज्यामध्ये दोघांच्या गळ्यात वरमाळा दिसत आहेत.

दोघांचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये या दोघांनी कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट हातात धरलेलं दिसत आहेत. राखीचा असा फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले असून त्यांना या बद्दल जाणून घ्यायचं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी आणि आदिलचं लग्न
समोर आलेल्या फोटोत दोघांनीही त्यांच्या कोर्ट मॅरेजचं प्रमाणपत्र हातात धरलं आहे. आदिल आणि राखीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये राखीने पांढरा आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे तर दुसरीकडे आदिल सिंपल लूकमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या शर्टसोबत डेनिम जीन्स घातली आहे. त्याचबरोबर, दुसऱ्या फोटोत दोघंही त्यांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत.