बलात्कारापासून वाचण्यासाठी राखी सावंतचा हा सल्ला

पाहा हा व्हिडिओ

बलात्कारापासून वाचण्यासाठी राखी सावंतचा हा सल्ला  title=

मुंबई : राखी सावंत आणि वाह जणू हे समीकरणच आहे. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी व्हिडिओमुळे राखी सावंत चर्चेत राहिली आहे. बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या #MeToo चळवळीनंतर पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत आली. तनुश्री दत्तावर तिने केलेले आरोप हे अतिशय धक्कादायक आहेत. असं असताना राखी सावंतने आता मुलींना बलात्कारापासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. 

हा व्हिडिओ बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ बघून लक्षात येईल की राखी सावंत फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी काहीही करू शकते. या व्हिडिओत राखी स्वतःला संशोधक म्हणत आहे. आणि मुलींना स्वतःला बलात्कारापासून वाचवण्यासाठी काय सल्ले ती देत आहे हे बघा. ती मुलींना सांगते की, कंबरेला साखळी आणि टाळं लावून घ्या 

बुधवारी राखी सावंत तनुश्री दत्ता विरोधात #SheToo ही चळवळ सुरू केली आहे. राखीचा आरोप आहे की, तनुश्रीने अनेकदा मला रेव पार्टीला घेऊन गेली. तनुश्री अनेकदा ड्रग्स घेतले असून मला देखील जबरदस्तीने दिले आहे. तसेच राखीने आरोप केला आहे की, तनुश्रीने तिच्या प्रायव्हेट पार्टला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर गँगरेप करण्याची धमकी दिली.