राखी सावंत म्हणतेय, 'मला भूतानं झपाटलं'

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित बिग बॉस या रिएलिटी शोचा १४वा पर्व सध्या सुरू आहे

Updated: Dec 24, 2020, 08:58 PM IST
राखी सावंत म्हणतेय, 'मला भूतानं झपाटलं' title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित बिग बॉस या रिएलिटी शोचा १४वा पर्व सध्या सुरू आहे. स्पर्धकांसाठी चॅलेंजर्स म्हणून जुन्या सिझनच्या काही स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. सात ड्रामेबाज राखी सावंतने चॅलेंजर म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. राखी घरात दाखल झाल्यापासून ती चर्चेत राहण्यासाठी अनेक गोष्टी करताना दिसतेय. 

प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी राखीने आता भूताचं सोंग केलं आहे. “मला भूताने झपाटले आहे आणि मी जेव्हा स्वत:ला आरशात बघते तेव्हा विचित्र चित्र समोर दिसतं” असं राखीचं म्हणणं आहे. राखीच्या ड्रामामुळे बिग बॉसच्या घरात राहणारे अनेक स्पर्धक घाबरलेत.

याशिवाय बिग बॉसमध्ये जास्मिन भसीन, एजाज खान, अली गोनी, रूबीना दिलैक, अभिनव शुक्ला हे बिग बॉस १४ पर्वाच्या सुरूवातीपासून आहेत. दरम्यान या सगळ्यांमध्ये ड्रामेबाज राखी सावंत सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.