भारती सिंगचा लग्नात राखी सावंतचा 'नागीण डान्स' ठरला हीट

कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा आज गोव्यामध्ये विवाह संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून  सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 3, 2017, 04:16 PM IST
भारती सिंगचा लग्नात राखी सावंतचा 'नागीण डान्स' ठरला हीट  title=

मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा आज गोव्यामध्ये विवाह संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून  सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. 

आधी पूल पार्टी त्यानंतर मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम रंगला. यामध्ये सेलिब्रिटींनी हजेरी लावत त्यांच्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये धमाल मस्ती केली. 

राखी सावंत, सिद्धार्थ जाधव यासारखे मराठी कलाकारदेखील लग्न सोहळ्यासाठी गोव्याला पोहचले होते. 
स्वतः भारतीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लग्न सोहळ्याचे काही कार्यक्रम लाईव्ह दाखावले होते. भारतीच्या घरातील लगीनघाई तिच्या चाहत्यांसाठी सोशलमीडियाच्या माध्यमातून खुली ठेवण्यात ठेवण्यात आली होती. 

राखी सावंतचा नागीण डान्स  

 

 

 

भारतीच्या लग्नात खुद्द नवरदेव आणि नवरीचा डांस पाहणं जितका मजेशीर प्रकार होता. तितकाच अभिनेत्री राखी सावंतचा डांस खास होता. राखी सावंतचा नागीण डांस बॉलिवूडलाईफच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

भारती आणि हर्षचा लग्नसोहळा हटके आणि भव्य स्वरूपात करण्यात आला आहे. या लग्न सोहळ्यात सुमारे ५० लाखांचा खर्च करण्यात आला.