मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. राजू यांच्या मॅनेजरकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या अनेक दिवसांपासून एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर नयन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. आता नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये राजू यांनी हात आणि शरीराचे काही भाग हलवू लागले आहेत.
दरम्यान, डॉक्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांनाही भेटण्यास मनाई केली आहे. याचे कारण संसर्गाची भीती सांगितली आहे. व्हेंटिलेटरवर संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे आता कोणीही राजू यांना भेटू शकत नाही.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.