राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून पहिल्यांदाच आली महत्त्वाची अपडेट

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबाकडून  महत्त्वाची अपडेट समोर..   

Updated: Aug 13, 2022, 10:54 AM IST
राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून पहिल्यांदाच आली महत्त्वाची अपडेट title=

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) प्रकृतीबाबद मोठी अपडेट समोर येत आहे. रिपोर्टनुसार, त्यांच्या प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. राजू यांच्या प्रकृतीबद्दल रंगलेल्या चर्चांनंतर त्यांच्या कुटुंबाची मोठी अपडेट समोर येत आहे. राजू यांच्या कुटुंबाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं चाहत्यांना आवाहन केलं आहे. आघाडीचा कॉमेडिअन राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून मृत्यूशी झुंज सुरू आहे. 

राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी ही त्याच्या तब्येतीविषयी ही अपडेट दिलीय. ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. 

राजू 43 तासांपेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर आहेत.राजूच्या उपचारासाठी कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम तसेच न्यूरोलॉजी टीम तैनात करण्यात आली आहे. उपचारांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टर चिंतेत आहेत. 

अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला सामान्य वॉर्डात हलवलं जातं. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतका कायम आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.