Raju Srivastava यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांकडून मोठी अपडेट

राजू श्रीवास्तवची 31 दिवसांपासून जीवनाशी झुंज; डॉक्टरांकडून मोठी अपडेट  

Updated: Sep 10, 2022, 07:59 AM IST
Raju Srivastava यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांकडून मोठी अपडेट title=

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Health Update)  गेल्या 31 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत होती. परंतू आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे. राजू श्रीवास्तव यांना ताप आला असून ते बेशुद्ध आहेत. राजू अद्यापही व्हेंटिलेटरवर आहेत. राजू यांनी यापूर्वीही एकदा ताप आला होता. मात्र, हळूहळू त्याची बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सुधारत असल्याची माहिती समोर आली. (raju shrivastav health update doctors decided to remove comedian raju srivastava ventilator support oxygen level)

मिळालेल्या माहितीनुसार, राजू बर्याच काळापासून बेशुद्ध आहे आणि त्याचा मेंदू पाहिजे तसा कार्य करत नाही... हीच भीती डॉक्टरांना सतावत आहे. राजू अजूनही व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यांना कोविड किंवा कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने सोशल मीडियाद्वारे व्हीडिओ शेअर करून माहिती दिली की, ते बरे होत आहेत आणि डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांची सतत काळजी घेत आहे. (raju srivastava is still unconscious on ventilator)

गेल्या 10 ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे व्हेंटिलेटर आहेत. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतायेत. SOD डॉ. पद्मा श्रीवास्तव आणि डॉ. अचल श्रीवास्तव दिल्लीच्या एम्समध्ये त्यांच्यावर उपचार करत आहेत.