'या' दिवशी रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षयचा सिनेमा '२.०'

खूप मोठ्या कालावधीनंतर निर्मात्यांनी सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Jul 27, 2018, 11:08 AM IST
'या' दिवशी रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षयचा सिनेमा '२.०'  title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार आणि बॉलीवुड खिलाडी अक्षय कुमार यांचा बहुचर्चित सिनेमा '२.०' ची दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत. २ आठवडे आधीच या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीयं. खूप मोठ्या कालावधीनंतर निर्मात्यांनी सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा मार्ग आता मोकळा झालायं. 

प्रदर्शनाबाबत संभ्रम

 रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा सिनेमा '२.०' बद्दल आतापर्यंत अनेक चर्चा रंगल्या. याच्या रिलीज डेट मागे पुढे करुन सांगण्यात आले. त्यामुळे हा सिनेमा २०१८ मध्ये पाहायला मिळणार नाही असेच दर्शकांना वाटु लागले होते. अक्षय आणि रजनी दोघंही मोठे कलाकार आहेत... आणि त्यांची एक फॅन फॉलोईंगही आहे... हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित होणार होता... परंतु, कधी बॉक्स ऑफिसवरील तारखांच्या क्लॅशमुळे तर कधी एडिटींगच्या कामामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

२९ नोव्हेंबरला रिलीज 

आता निर्मात्यांनीच सिनेमा या वर्षात रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. '२.०' २९ नोव्हेंबर २०१८ ला रिलीज होणार आहे. ट्रेण्ड एनालिस्ट रनेश बाला यांनी आपल्या ट्ववीटर हॅण्डलवरून याची माहिती दिली.  तब्बल ४५० कोटी रुपयांच बजेट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकतो किंवा नाही, हे लवकरच समजेल.