Gandhi Godse Ek Yudh: 'पठाण'नंतर 'गांधी विरुद्ध गोडसे'वरुन वाद! मुंबईत राजकुमार संतोषींना दाखवले काळे झेंडे

Gandhi Godse Ek Yudh: या चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) नऊ वर्षानंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत असतानाच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Updated: Jan 21, 2023, 08:29 AM IST
Gandhi Godse Ek Yudh: 'पठाण'नंतर 'गांधी विरुद्ध गोडसे'वरुन वाद! मुंबईत राजकुमार संतोषींना दाखवले काळे झेंडे title=
Protest Against Gandhi Godse Ek Yudh (Photo : Screengrab from instagram video posted by voomla)

Protest Against Gandhi Godse Ek Yudh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषींच्या (Rajkumar Santoshi) 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाची मागील काही दिवसांपासूनच चांगलीच चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झालं. ट्रेलरमध्ये हा चित्रपट गोडसेने (Nathuram Godse) महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) हत्या का केली या विषयाबद्दल असल्याचे संकेत मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर (Gandhi Godse Ek Yudh Trailer) पाहूनच अनेकांनी या चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये एका चित्रपटगृहामध्ये या चित्रपटासंदर्भात संतोषी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये संतोषी यांना काळे झेंडे (Black Flags) दाखवण्यात आले.

मुंबईत (Mumbai) शुक्रवारी ही पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेदरम्यान अचानक गोंधळ झाला जेव्हा काही जण उठून घोषाबाजी करु लागले. या पत्रकार परिषदेमध्ये काही जणांनी 'गांधीजी अमर रहे'च्या घोषणा दिल्या आणि संतोषींना काळे झेंडे दाखवले. या घटनेचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर 'व्ह्यूम्पला'ने (Voompla) आपल्या अधिकृत इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संतोषी आपली भूमिका मांडण्यासाठी माईकवर बोलत असताना काहीजण स्टेजच्या डाव्याबाजूला आले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. हातात काळे झेंडे पकडलेल्या या लोकांनी, "गांधीजी अमर रहे" अशा घोषणा दिल्या. संतोषी त्यांना स्टेजवरुनच समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या विरोध करणाऱ्यांची घोषणाबाजी सातत्याने सुरु होती. अखेर या घोषणाबाजीनंतर संतोषी यांनी सर्व पत्रकारांना लंचसाठी आमंत्रित केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

'गांधी-गोडसे एक युद्ध' चित्रपटाला विरोध केला जात असतानाच संतोषी यांना पोलीस संरक्षणामध्ये चित्रपटगृहाबाहेर काढण्यात आलं. सोशल मीडियावर या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी संतोषी यांच्या बाजूने तर काहींनी त्यांच्याविरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये लोक हा चित्रपट पाहताना त्यामधील कथनाकाकडे पाहतील अशी अपेक्षा संतोषी यांनी व्यक्त केली. 

'गांधी-गोडसे एक युद्ध' हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकुमार संतोषी हे जवळजवळ नऊ वर्षानंतर दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. या चित्रपटामध्ये गांधींची भूमिका गुजराती अभिनेते दिपक अंतानी यांनी साकारली आहे. तर गोडसेच्या भूमिकेमध्ये मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर दिसणार आहे. चिन्मयने यापूर्वी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटामध्ये साकारलेली दहशतवाद्याची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने चिन्मय पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार आहे.