अभिनेता राजकुमार रावला मोठा धक्का; ठरला फसवणूकीचा बळी

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर येत आहे.

Updated: Apr 2, 2022, 05:32 PM IST
अभिनेता राजकुमार रावला मोठा धक्का; ठरला फसवणूकीचा बळी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर येत आहे. नुकतच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की, ''कोणीतरी माझ्या पॅन कार्डचा गैरवापर केला आहे आणि माझ्या नावावर कर्ज घेतलं आहे. राजकुमारने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

राजकुमार सोबत फसवणूक
या फसवणुकीमुळे त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम झाल्याचा दावा राजकुमार रावने केला आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अधिकार्‍यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे.

राजकुमार रावचं ट्वीट
त्याने ट्विट करून लिहिलं आहे की, #FraudAlert माझ्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे आणि माझ्या नावावर 2500 रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. त्यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवर परिणाम झाला आहे. CIBIL कृपया यात सुधारणा करा आणि त्याविरुद्ध आवश्यक पावलं उचला.

राजकुमारची पोस्ट व्हायरल 
राजकुमार रावच्या या ट्विटवर सिबिलकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचबरोबर अभिनेत्याचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटवर लोकं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.