अनुष्का-प्रियांकानंतर आता 'या' अभिनेत्रीनेकडून गुडन्यूज

या स्टार कपलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Updated: Apr 2, 2022, 04:48 PM IST
अनुष्का-प्रियांकानंतर आता 'या' अभिनेत्रीनेकडून गुडन्यूज title=

मुंबई : 'कुंडली भाग्य' या प्रसिद्ध टीव्ही शोमधून घराघरात आपला ठसा उमटवणारा धीरज धूपर आणि त्याची अभिनेत्री पत्नी विनी अरोरा लवकरच पालक होणार आहेत. या स्टार कपलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विनी अरोरा आणि धीरजची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विन्नी आणि धीरजची पोस्ट 
ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी विनी अरोरा आणि धीरज धूपर यांनी त्यांचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत विनी आणि धीरज एकमेकांसोबत  लिपलॉक  करताना दिसत आहेत. यासोबत विनी त्याचा अल्ट्रासाऊंडही दाखवत आहे. तर दुस-या फोटोत विनी आणि धीरज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

जाळीदार ड्रेसमध्ये दाखवला बेबी बंप
समोर आलेल्या फोटोंमध्ये, विनी पांढऱ्या जाळीच्या ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. फोटो शेअर करत विनी आणि धीरजने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आम्ही लवकरच जादूची अपेक्षा करत आहोत." यासोबतच तिने तिचा डिलिव्हरी महिनाही जाहीर केला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये हे कपल त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल झाली ही गुड न्यूज़
विनी आणि धीरजची पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आहे. यासोबतच या गुड न्यूजसाठी सगळ्या चाहत्यांसोबत सेलेब्स देखील या कपलचं अभिनंदन करत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत. या पोस्टला अवघ्या दोन तासांत सुमारे दीड लाख लाईक्स मिळाले आहेत.