संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाची रिलिज डेट बदलली ?

 'पिके'. थ्री ईडियट्स' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटाची अनेकांमध्ये उत्सुकता  आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार यांनी केले आहे.  

Updated: Jan 6, 2018, 08:29 AM IST
संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाची रिलिज डेट बदलली ?   title=

मुंबई : 'पिके'. थ्री ईडियट्स' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटाची अनेकांमध्ये उत्सुकता  आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार यांनी केले आहे.  

संजय दत्त वरील बायोपिक  

संजय दत्त यांच्या आयुष्यावर  आधारित चित्रपट राजकुमार हिरानी रसिकांसमोर लवकरच घेऊन येणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने मेहनत घेतली आहे. 

रिलीज डेट पुढे 

रणबीर कपूर अभिनित संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची रिलीज डेट २९ जून असल्याचे सांगण्यात आले होते. यापूर्वी हा सिनेमा ३० मार्च रोजी रिलीज होणार होता.

टक्कर कोणाशी ? 

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ या फ्रेश जोडीचा ' बागी २' हा चित्रपट आणि संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट एकाच वेळी रिलीज होणार होते. मात्र ही टक्कर टाळण्यासाठी संजय दत्तच्या बायोपिकची रिलिज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.  

बागी २ या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. 'बागी' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पहिल्यांदा टायगर आणि दिशा ही फ्रेश जोडी एकत्र झळकणार आहे.   

संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट 

संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मात्र अजूनही या चित्रपटाचे टायटल सांगण्यात आलेले नाही. या चित्रपटामध्ये मनीषा कोयराला, अनुष्का शर्मा, विक्की कौशल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजकुमार  हिराणी दिग्दर्शित या चित्रपटाची   निर्मिती विधू विनोद चोप्रा करणार आहेत. यापूर्वी या जोडीने 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' यासारखे दोन हीट चित्रपट दिले आहेत.