राज कुंद्रच्या एका निर्णयामुळे शिल्पा शेट्टी कोट्यवधींची मालकीण

राज कुंद्राने का घेतला टोकाचा निर्णय?   

Updated: Feb 4, 2022, 02:25 PM IST
राज कुंद्रच्या एका निर्णयामुळे शिल्पा शेट्टी कोट्यवधींची मालकीण title=

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा सतत चर्चेत आहे. पण यावेळी राज पॉर्नोग्राफी प्रकरणावरून नाही तर त्याच्या संपत्तीमुळे चर्चेत आला आहे. राजने त्याची संपत्ती शिल्पा शेट्टीच्या नावावर केली आहे. राजने अचानक हा निर्णय का घेतला? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. राजने कोट्यवधी रूपयांची संपत्ती पत्नीच्या नावावर केली आहे. 

Squarefeatindia.com नुसार मुंबईतील फ्लॅट्स राज कुंद्राने शिल्पाच्या नावावर केले आहेत. आता तुम्ही म्हणाल एक फ्लॅट त्याने शिल्पाच्या नावावर केला असेल. पण नाही राजने पत्नीच्या नावावर एक, दोन नाही तर पाच फ्लॅट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

राज कुंद्राने जुहू येथील ओशन व्ह्यू नावाच्या इमारतीत हे फ्लॅट घेतले होते. Squarefeatindia.com चे संस्थापक वरुण सिंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज कुंद्राच्या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. 

राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती...
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राज कुंद्रावर पोर्न व्हिडीओ शूट आणि सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राज कुंद्रा सुमारे 2 महिनी तुरूंगात होता..  तुरूंगातून बाहेर आल्यानंतर तो अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर होता.