करवा चौथला 'हा' प्रसिद्ध गायक पत्नीच्या पाया पडला, VIDEO आला समोर

'हा' प्रसिद्ध गायक पत्नीच्या पाया पडला, कोण आहे हा स्टार? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Updated: Oct 14, 2022, 06:40 PM IST
करवा चौथला 'हा' प्रसिद्ध गायक पत्नीच्या पाया पडला, VIDEO आला समोर  title=

मुंबई : देशभरात गुरूवारी 13 ऑक्टोबर रोजी करवा चौथ सण (Karwa Chauth Vrat) साजरा करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्रींसह टीव्ही कलाकारांनी हा सण साजरा करून सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. अशाच एका प्रसिद्ध कपलने आता करवा चौथ साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या कपलच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

हे ही वाचा : नेटफ्लिक्स धारकांसाठी मोठी बातमी, सर्वांत स्वस्त प्लॅनची घोषणा

दिशा परमार (Disha parmar) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे टीव्हीचे लोकप्रिय जोडपे आहेत. दोघांच्या लग्नाला 1 वर्ष पुर्ण झाले आहेत, मात्र आजही दोघांमध्ये प्रेम आणि रोमान्स कायम आहे. यावर्षी राहुल आणि दिशा यांनी दुसरा करवा चौथ साजरा केला. या करवा चौथचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये राहूल वैद्य पत्नीच्या पाया देखील पडला आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 

व्हिडिओत काय? 
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिशा (Disha parmar) करवा चौथचा व्रत (Karwa Chauth Vrat) सोडतेय. तिच्या समोऱ राहूल वैद्य (Rahul Vaidya) उभा आहे. दिशा त्याला ओवाळते आणि त्याला तिला पाणी आणि मिठाई भरवायला सांगते. हे सर्व झाल्यावर ती शेवटी राहूलच्या पाया पडते. यानंतर राहूल देखील तिच्या पायाला स्पर्श करतो. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारतात.

हे ही वाचा : Dhanashree Verma सोशल मीडियावर होतेय ट्रोल, 'हे' आहे कारण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@rahulvaidyarkv)

हा व्हिडीओ शेअर करत राहुलने  (Rahul Vaidya) लिहिले की,आदर...आदर...आदर, माझ्या लेडीसाठी आणि इतर महिलांसाठी ज्या आपल्या पतीसाठी उपवास ठेवतात. ही एक अशी फिलींग आहे जी खुप पवित्र आहे. आणि त्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो दिशा परमार... करवा चौथच्या शुभेच्छा.

राहूलने  (Rahul Vaidya) शेअर केलेल्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय. एका युझरने लिहले की, पती-पत्नी दोघेही समान आहेत, तर दुसऱ्या य़ुझरने, राहुल इन्स्पिरेशन असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान राहुल  (Rahul Vaidya) आणि दिशाने (Disha parmar) गेल्या वर्षी 16 जुलै रोजी लग्न केले होते. राहुलने बिग बॉस 14 मध्ये दिशा परमारला प्रपोज केले होते. त्याचवेळी दिशाने राहुलला बिग बॉसमध्ये गेस्ट म्हणून एन्ट्री मारत त्याचं प्रपोजल स्विकारलं होत. यानंतर दोघांनी मुंबईत लग्न केले होते. आता त्यांच्या करवा चौथची चर्चा आहे.