करवा चौथच्या दिवशी कपिल शर्माची पत्नी पडली बेशुद्ध; पूजेचे ताट पडताच बसला जोरदार धक्का

करवा चौथच्या वेळी घडला धक्कादायक प्रकार

Updated: Oct 14, 2022, 06:34 PM IST
करवा चौथच्या दिवशी कपिल शर्माची पत्नी पडली बेशुद्ध; पूजेचे ताट पडताच बसला जोरदार धक्का title=

'द कपिल शर्मा शो' या प्रेक्षकांच्या आवडता कॉमेडी शोची (The Kapil Sharma Show) चाहते प्रत्येक वीकेंडला आतुरतेने वाट पाहत असतात. या शोचा होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma) चाहत्यांना हसवण्यासाठी प्रत्येक वेळी त्याच्या टीमसोबत काहीतरी नवीन स्किट आणतो. आता कपिलच्या शोमध्ये करवा चौथचा सणही साजरा करण्यात आलाय. कपिल शर्मा प्रत्येक बाबतीत भाग्यवान आहे असे म्हणता येईल. कारण एक नाही तर दोन महिलांनी कॉमेडियन कपिल शर्मासाठी उपवास ठेवला होता. नुकताच 'द कपिल शर्मा शो'चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोकांचे हसू आवरत नाहीये.

यामध्ये कपिलची पत्नी बेशुद्ध पडल्याचे पाहायला मिळत आहे. द कपिल शर्मा शोमध्ये कॉमेडियनच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (sumona chakravarti) बेशुद्ध पडल्याचे पाहायला मिळते. प्रोमोमध्ये कपिल शर्मा पत्नी बिंदू आणि गर्लफ्रेंड गझल यांच्यात अडकतो आणि त्या दोघांसोबत करवा चौथ साजरा करतो. प्रोमो व्हिडीओमध्ये कप्पूची अवस्था पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. चंद्र पाहिल्यानंतर सुमोना आणि सृष्टी रोडे कपिलची आरती करतात तेव्हा कप्पू गर्लफ्रेंन्डकडे जातो. यादरम्यान सुमोना अचानक बेशुद्ध होते आणि तिचे पूजेचे ताट खाली पडते. पत्नीची अशी अवस्था बघून कपिलला धक्का बसतो.

हा व्हायरल व्हिडिओ सोनी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो चाहत्यांना खूप पसंत केला आहे. आता प्रोमो पाहून चाहत्यांना संपूर्ण एपिसोडची उत्सुकता लागली आहे. कपिल शर्मा शो उद्या रात्री म्हणजेच शनिवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर पाहता येणार आहे.