पॅरिसमध्ये फिरत असलेल्या अंबानींच्या सूनेच्या 'या' साध्यासूध्या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरात

Radhika Merchant Orange Dress Price : राधिका मर्चेंटनं पॅरिसमध्ये परिधान केलेल्या ड्रेसची किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

दिक्षा पाटील | Updated: Aug 2, 2024, 04:23 PM IST
पॅरिसमध्ये फिरत असलेल्या अंबानींच्या सूनेच्या 'या' साध्यासूध्या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरात   title=
(Photo Credit : Social Media)

Radhika Merchant Orange Dress Price : अंबानी कुटुंब हे सध्या पॅरिसमध्ये असून ते भारतीय खेळाडूंना ऑलम्पिकमध्ये पाठिंबा देत आहेत. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर संपूर्ण अंबानी कुटुंब हे पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पॅरिसमधील अंबानी कुटुंबाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अंबानी कुटुंब हे चांगलंच चर्चेत आहे. पण यावेळी अनंत आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यासगळ्यात इंटरनेटवर एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे राधिका मर्चेंटचा ड्रेस. 

अनंत आणि राधिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना सगळ्यांचं लक्ष हे राधिकाच्या नारंगी ड्रेसनं वेधलं आहे. खरंतर या ड्रेसमध्ये राधिका खूप सुंदर दिसत होती. तिच्या ड्रेसविषयी बोलायचे झाले तर हा स्क्वेअर नेकलाइनचा ड्रेस आहे. बस्टवर बटनची डिझाइन, स्टायलिश बॅकलेस असा ड्रेस असून फ्लेअर्ड बॉटम आणि मिनी हेमलाइन आहे. राधिकाचा हा ड्रेस वर्साचे ब्रॅंडच्या ट्विल क्रॉप टॉप आणि प्लीटेड ट्विल मिनीस्कर्ट आहे. हा टॉप ग्रीक पौराणिक गोष्टींमधून प्रेरित आहे. 

किती आहे किंमत

एका वेबसाईटनुसरा, या टॉपची किंमत ही 1,07,938 लाख रुपये आहे. तर तिनं परिधान केलेल्या स्कर्टची किंमत ही 1,150 यूरो अर्थात 1,04,087 लाख रुपये आहे. याचाच अर्थ या एका संपूर्ण ड्रेसची किंमत ही 2 लाख 12 हजार रुपये आहे. सध्या हे स्कर्ट आता डिस्काउंटवर म्हणजेच 581 यूरोच्या आसापस म्हणजेच जवळपास 52,455 रुपयांमध्ये मिळू शकतो. 

Radhika Merchant orange dress price which she wore in paris

या ड्रेससोबत राधिकानं स्वत: ला स्टाईल करण्यासाठी पांढऱ्या रंगाची क्रॉसबॉडी स्लिंग बॅग, छोटे कानातले आणि पांढरी बुटं घातले आहेत. तिनं पोनीटेल करत स्वत: ला स्टाईल केलं आहे. त्याच दरम्यान, राधिका विना मेकअप खूप सुंदर दिसते. 

हेही वाचा : 'अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही...', जया बच्चन यांनी जेव्हा केला होता खुलासा 

यासोबतच राधिकाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राधिकानं परिधान केलेला मॅक्सी ड्रेस हा सिंड्रो पॅरिसच्या ब्रॅंडचा होता. लाइट ब्लू रंगाचा असलेला या ड्रेसची किंमत ही 295 युरो म्हणजेच 26 हजार 637 रुपये आहे. राधिकाचा मेकअप लूक हा नेटकऱ्यांना प्रचंड आवडला.