मुंबई : राधिका आपटे हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. राधिकाने बी-टाऊनमध्ये अनेक आउट ऑफ द बॉक्स चित्रपट दिले आहेत. राधिका केवळ बॉक्स ऑफिसची राणीच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म क्वीन देखील आहे. राधिका आपटे सध्या तिच्या 'विक्रम वेध' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलली आहे.
2012 मध्ये बेनेडिक्ट टेलरचं लग्न
राधिका आपटे विवाहित आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. अभिनेत्रीने 2012 मध्ये ब्रिटीश संगीतकार आणि व्हायोलिन वादक बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं होतं. अभिनेत्रीने 2013 मध्ये तिच्या लग्नाची अधिकृत माहिती दिली होती. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, तिच्याकडे लग्नाचा एकही फोटो नाही.
फोटो क्लिक करायला विसरली
राधिका आपटेने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, जेव्हा तिचं आणि बेनेडिक्टचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तेव्हा आम्ही फोटो क्लिक करायला विसरलो होतो. आमच्या लग्नाला आम्ही फक्त एका खास मित्राला आमंत्रित केलं होतं. जेवणही आम्ही स्वतः बनवलं होतं. आमची पार्टी झाली पण एकही फोटो क्लिक झाला नाही. आमचे बहुतेक मित्र फोटोग्राफर आहेत.
नशेमुळे क्लिक केले नाही फोटो
राधिका आपटेने मुलाखतीत पुढे सांगितलं की, आमचं लग्न उत्तर इंग्लंडमध्ये झालं. पार्टी दरम्यान आम्ही सर्वजण खूप नशेत होतो. म्हणूनच आमच्याकडे कोणतेही फोटो नाहीत. पण मी आणि माझा नवरा जेव्हाही सुट्टीवर जातो तेव्हा काही फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतो.