फोटोस : बालीच्या बीचवर वर्कआऊट करतेय जॅकलीन फर्नांडिस

सध्या ती बालीमध्ये हॉलीडे एन्जॉय करतेय. तिथेच वर्कआऊट करतानाचे फोटोस तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Updated: Dec 30, 2017, 12:09 PM IST
  फोटोस : बालीच्या बीचवर वर्कआऊट करतेय जॅकलीन फर्नांडिस  title=

बाली : जॅकलीन फर्नांडिसला सुदृढ आणि फिट राहणं चांगल जमत. ती नेहमी आपल्या वर्कआऊट सेशनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

रेस ३ ची तयारी 

सध्या ती बालीमध्ये हॉलीडे एन्जॉय करतेय. तिथेच वर्कआऊट करतानाचे फोटोस तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रेस ३ च्या शुटींगमध्ये ती सध्या बिझी आहे.

रेमो डिसूझा हा सिनेमा दिग्दर्शित करीत आहे. जॅकलिनसोबत सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देऑल, शाकिब सलीम आणि डेजी शाह या सिनेमात दिसणार आहेत. 

मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण

 

Vitamin Sea post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

प्रसारमाध्यमातील वृत्तांनुसार, जॅकलिन सिनेमासाठी मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) ची ट्रेनिंगदेखील घेत आहे. यावर तिला विचारले असता, मी माझ्या रोलसाठी नवनवे शिकण्यास उत्सूक असते असे तिने सांगितले. 

 

Happy food #coconutlove 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

'ड्राइव्ह' 

 

Famfam 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

तरुण मनसुखानीच्या 'ड्राइव्ह' सिनेमातही जॅकलिन दिसणार आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत तिच्यासोबत दिसेल.