Raaj kumar daughter vastavikta pandit : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा चित्रपटसृष्टीपासून दूर होता. 2022 साली शाहिदचा जर्सी (Jersey) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आता शाहिदने OTT विश्वात पदार्पण केलं आहे. त्याची फर्जी ही वेब सीरिज (web series) प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या वेब सीरीजमध्ये शाहिदसोबतच अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरीजमधील शाहिदच्या किलर लूकने अनेकांचे लक्ष वेधले. त्या या लूकमुळे चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र काही वर्षांपूर्वी शाहिद वर वेळ अशी आली होती एका एका चाहतीमुळे त्याला पोलिसांची पायरी चढावी लागली होती. नेमकी काय घटना घडली होती जाणून घेऊया...
'इश्क विश्क' आणि 'जब वी मेट' सारखे चित्रपटानंतर शाहिद कपूरचा चॉकलेट बॉय लूक प्रेक्षकांनी आवडायला लागला. त्याचदरम्यान एका चाहतीमुळे शाहिद कपूरला खूप त्रास सहन करावा लागला. ती चाहती दुसकी कोणी नसून दिग्गज अभिनेते राज कपूर यांची मुलगी वास्तविकता पंडितमुळे ( Raaj kumar daughter vastavikta pandit ) शाहिद त्रासाला सामोरे जावे लागले.
वाचा : रिअल लाइफ बधाई हो! 23 वर्षांच्या तरुणीला फोन आला, तुझी 47 वर्षांची आई गर्भवती आहे...
शाहिद आणि वास्तविकता (vastavikta pandit) यांची भेट शामक दावर यांच्या डान्स क्लासमध्ये झाली होती. त्यांनी एकत्रच प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाहिदने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी वास्तविकता त्याच्या प्रेमात पडली, मात्र शाहिदच्या मनात तिच्याबद्दल तसे काही नव्हते. ती प्रेमाच ऐवढी वेडी झाली होती की तिने शाहिदचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. वर्ष 2012 मधला ही घटना असून शाहिद जिथे जायचा तिथे ती त्याच्या पाठलाग करायची.
शाहिद चित्रपटाच्या सेटवर जात असो किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जात असो. वास्तविता (vastavikta pandit) त्यांचा पाठलाग करायची. अनेकदा ती त्याच्या गाडीच्या बोनेटवर बसायची कारण तिला सांगायचं होतं की ती किती मोठी फॅन आहे. मात्र, शाहिदच्या घराला लागून असलेल्या घरात राहायला लागल्यावर तिने सर्व मर्यादा ओलांडल्या. इतकंच नाही तर आजूबाजूच्या लोकांसमोर ती स्वत:ला शाहिदची पत्नी म्हणून ओळख सांगायला लागली. या प्रकरणानंतर शाहिदने अखेर तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली.