R. Madhavan's Son Vedaanat Won 5 Gold Medals : बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं ही नेहमीच चर्चेत असतात. कलाकारांची मुलं कलाकाराचं होणार असं म्हणतात. काही स्टारकिड्स आहेत जे बॉलिवूडमध्ये त्यांचं करिअर करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेता आर. माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत (Vedaant) हा अभिनयात त्याचं करिअर करत नसून स्विमिंगमध्ये करत आहे. वेदांतनं पुन्हा एकदा फक्त आर. माधवनचं नाही तर संपूर्ण भारताला त्याच्यावर गर्व होईल असं काम केलं आहे. आता वेदांतनं स्विमिंगमध्ये पुन्हा एकदा 5 गोल्ड मेडल मिळवली आहेत.
आर. माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याचा खुलासा केला आहे. आर. माधवननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात वेदांत आणि त्याच्या गळ्यात पाच गोल्ड मेडल असल्याचे दिसत आहे. त्यासोबत तिरंग्यासोबत वेदांतनं पोज दिल्या आहे. तर हे फोटो शेअर करत आर. माधवननं '58 व्या MILO/MAS मलेशिया इन्विटेशनल एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिप भाग घेतला होता. यात वेदांतनं 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, 400 आणि 1200 मीटर स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. आर. माधवनला त्याच्या मुलानं केलेल्या या कामानं खूप गर्व होत आहे,' असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत त्यानं त्याचा आनंद व्यक्त केली आहे.
आर. माधवननं शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये वेदांत त्याच्या आईसोबत दिसत आहे. आर. माधवननं सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याला किती गर्व झाला आहे हे सांगितले आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये फक्त त्याचे चाहते नाही तर त्यांच्यासोबत सेलिब्रिटीदेखील आहेत. टिस्का चोप्रा, लारा दत्ता आणि जुबेर खानपर्यंत तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सूर्यानं देखील आर. माधवनच्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : Hrithik Roshan च्या बॉडीगार्डनं दिला चाहत्याला धक्का! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्याला ट्रोल
आर माधवनचा मुलगा व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असलेल्या वेदांतच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वेदांतनं मेडल मिळवण्याची ही पहिली वेळ नाही तर याआधी देखील वेदांतनं भारतासाठी अनेक पदक मिळवली आहेत. प्रत्येकवेळी आर. माधवनच्या मुलानं मेडल मिळवले आहेत. वेदांतनं याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये देखील 5 गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल जिंकले होते. या स्पर्धत वेदांतनं महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले होते.