Pyaar Ka Punchnama 3 : 2011 मध्ये प्रदर्शित झालेला 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाचे एका वेगळाच फॅन बेस आहे असं म्हणता येईल. रिलेशनशिपला घेऊन एक वेगळी बाजू पाहायला मिळाली होती. ज्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना कनेक्ट झाला होता. या चित्रपटातून कार्तिक आर्यन हा अभिनेता बनला. त्याच्या त्या भल्या मोठ्या डायलॉगला प्रेक्षकांकडून खूप जास्त पसंती मिळाली होती. आता लव्ह रंजनचा हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. पण ही बातमी असली तरी सुद्धा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती ही बातमी आहे की कार्तिक आता या फ्रेंचायझीचा भाग राहणार नाही.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आता या फ्रेंचायझीचा 3 भाग येणार आहे. यावेळी मॉर्डन रिलेशनशिप दाखवण्यात येणार आहे. तर या सगळ्याची कहाणी त्याच्या आजुबाजूला फिरणारी आहे. पण कार्तिक आर्यन या चित्रपटात नसणार आहे. पण एका नव्या कथेप्रमाणे या चित्रपटाची कास्ट देखील वेगळी असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
'प्यार का पंचनामा' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या लव्ह रंजनच्या या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय, दिव्येंदु शर्मा, नुसरत भरुचा, सोनाली सहगल आणि इशात राज शर्मा दिसले होते. ही कथा तीन बॅचलर्सची होती, जे मुलींच्या प्रेमात आहेत. पण त्याचं आयुष्य तेव्हा 360 डिग्री फिरतं जेव्हा त्या मुली त्यांच्या गर्लफ्रेंड्स त्यांना खूप फिरवतात. हा चित्रपट खूप हिट झाला. त्यानंतर 2015 मध्ये 'प्यार का पंचनामा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सोनाली सहगल आणि इशिता राज शर्मा यांच्याशिवाय ओमकार कपूर आणि सनी सिंह दिसले होते.
हेही वाचा : 'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट
कार्तिक आर्यनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'चंदू चॅम्पियन' नंतर आता तो 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. इतकंच नाही तर त्यांनी ही पटकथा लिहिली देखील आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' आणि 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी दिसणार आहे. याशिवाय 'भूल भुलैया' या चित्रपटात लीड भूमिका साकारणारी विद्या बालन या तिसऱ्या चित्रपटाता भाग असणार आहे. विद्या बालनशिवाय या चित्रपटात माधुरी दीक्षित देखील दिसणार आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.