Pushpa साठी Allu Arjun ला मिळाले इतके रुपये, बाकीच्या स्टारकास्टच्या फी चा आकडा कोट्यवधीत

या चित्रपटात काम करणार्‍या स्टारकास्टला किती रुपयांची ऑफर दिली आहे हे जाणून घेऊयात

Updated: Jan 3, 2022, 07:07 PM IST
Pushpa साठी Allu Arjun ला मिळाले इतके रुपये, बाकीच्या स्टारकास्टच्या फी चा आकडा कोट्यवधीत title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मीका मंदाना यांचा पुष्पा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. ज्यानंतर या चित्रपटाने लोकांना भलतेच वेड लावले आहे. जो पाहावा तो या सिनेमाचेच कौतुक करत आहे. एवढेच काय तर सोशल मीडियावर देखील या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. कोरोनाचा धोका वाढत असूनही सिनेमा चांगली कमाई करत आहे.

भरपूर ड्रामा आणि ऍक्शन असलेला तेलुगू चित्रपट 'पुष्पा: द राइज'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. एवढेच काय तर लोकांना आता हा सिनेमा करण्यासाठी यामधील स्टारकास्टला किती मानधन देण्यात आलं असेल, यासंदर्भात देखील जाणून घेण्याच उत्सुक्ता आहे. याची सोशल मीडियावर चर्चा देखील सुरू आहे.

या चित्रपटात काम करणार्‍या स्टारकास्टला किती रुपयांची ऑफर दिली आहे हे जाणून घेऊयात

अल्लू अर्जुन (Allu Arjun)

'पुष्पा: द राइज' चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने या चित्रपटात पुष्पा राज नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)

'पुष्पा: द राइज' या चित्रपटात रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसत आहे. बातमीनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी 8 ते 10 कोटींची ऑफर देण्यात आली होती.

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील 'ओ अंतवा ऊओ ऊ' आयटम साँग करताना दिसली आहे. बातमीनुसार, फक्त या गाण्यासाठी समंथाला 1.5 कोटी ते 2 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.

फहद फासिल (Fahadh Faasil )

अभिनेता फहद फासिलने या चित्रपटात आयपीएस अधिकारी भंवर सिंग शेखावत याची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फहादला या चित्रपटासाठी 3-4 कोटी रुपये मिळाले आहेत.

सुनील (Sunil)

'पुष्पा: द राइज' या चित्रपटात अभिनेता सुनीलने मंगलम श्रीनूची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीलला या भूमिकेसाठी 1 ते 1.5 कोटी रुपये मिळाले आहे.