मराठीनंतर आता 'श्रीवल्ली'चं अहिराणी व्हर्जन, हा व्हिडीओ एकदा पाहाच

मराठीनंतर आता स्थानिक भाषेत श्रीवली गाण्याला पसंती, अहिराणीतील श्रीवल्ली गाण्याची खास झलक पाहा 

Updated: Feb 12, 2022, 06:03 PM IST
मराठीनंतर आता 'श्रीवल्ली'चं अहिराणी व्हर्जन, हा व्हिडीओ एकदा पाहाच title=

मुंबई : पुष्पा सिनेमाची जगभरात चर्चा आहे. या सिनेमानं अगदी वयोवृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पुष्पाचे डायलॉग तर लग्नाच्या मंडपातही प्रसिद्ध झाले आणि गाण्यांवर रिल्स प्रसिद्ध झाले. पुष्पा पार्ट 1 च्या या अभूतपूर्व यशानंतर श्रीवल्ली गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन येऊ लागले. 

श्रीवल्ली गाण्याचे केवळ तमिळ, तेलगूच नाही तर मराठी, हिंदी, अहिराणी आणि डच व्हर्जनही आलं आहे. श्रीवल्ली या गाण्याच्या म्युझिकने तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वेगवळ्या रिल्स आणि या गाण्यावरील डान्समुळे अनेक नवख्या लोकांनाही खूप प्रसिद्धी मिळाली. 

श्रीवल्लीचं अहिराणी व्हर्जन आलं आहे. खान्देशातील माय म्हणून अहिराणीची ओळख आहे. मनोरंजनासाठी हे श्रीवल्लीचं अहिराणी भाषेत  नवीन व्हर्जन तयार करण्यात आलं आहे.