'पुष्पा'मधून आपल्या कामगिरीने लोकांचं लक्ष वेधणाऱ्या अल्लू अर्जुनचं बॉलिवूड सिनेमाबाबत मोठं व्यक्तव्य

अल्लू अर्जुनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा' या सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.

Updated: Jan 4, 2022, 04:12 PM IST
 'पुष्पा'मधून आपल्या कामगिरीने लोकांचं लक्ष वेधणाऱ्या अल्लू अर्जुनचं बॉलिवूड सिनेमाबाबत मोठं व्यक्तव्य title=

मुंबई : अल्लू अर्जुनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा' या सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. 'पुष्पा' या सिनेमात अल्लू अर्जुनचा अभिनय लोकांना खूप आवडत आहेत.  पण त्याला बॉलीवूडकडून कधीच चांगली ऑफर मिळाली नाही असं त्याचं म्हणणं आहे.

अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट 'पुष्पा: द राइज' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तब्बल 300 कोटींची कमाई केली असून त्यात हिंदी वर्जनने 64.66 कोटींचा आकडाही पार केला आहे. तेलुगु सिनेमाचा आवडता अभिनेता अल्लू अर्जुने एका मुलाखती मध्ये हिंदी सिनेमाच्या ऑफर संबधित वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मुलाखतीमध्ये अल्लू अर्जुनला, ''बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये हात आजमावायला आवडेल असं तू याआधी सांगितलं होतं, मग तुला कोणत्या गोष्टीने थांबवलं आहे, कारण आता तुला ऑफर्स तर येतच असतील? या प्रश्नावर अल्लू अर्जुन म्हणाला की, ''खरं सांगायचं झालं तर,  उत्तेजित करणार्‍या अशा आश्चर्यकारक ऑफर माझ्याकडे आल्या नाहीत. जर मला अशी ऑफर मिळाली तर मी ते करायला तयार आहे. हिंदी चित्रपटसृष्टी सर्वांनाच आवडते, त्यामुळे तिथे काम करायला मला खूप मजा येईल, पण आजपर्यंत मला आवडेल अशी एकही ऑफर मिळालेली नाही.''

याचबरोबर तुला कोणत्या प्रकारचा हिंदी चित्रपट करायचा आहे?  असा प्रश्नदेखील अभिनेत्याला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला यावंर अल्लू अर्जून म्हणाला, ''फक्त एक व्यावसायिक चित्रपट आणि एक चांगला चित्रपट. आणखी काही नको, मी व्यावसायिक अभिनेता असल्यामुळे मला समांतर सिनेमा आवडत नाहीत. ते माझ्यासाठी बनलेले नाहीत. मी या सिनेमाचा आदर करतो, मी त्याच्याकडे पाहतो, त्यांचं कौतुक करतो, माझ्या मेहनती चित्रपटांसाठी त्याच्याकडून प्रेरणा घेतो, पण मी स्वतःला त्या ठिकाणी पाहू शकत नाही.''

त्याचबरोबर अल्लू अर्जुनला मुलाखतीमध्ये ''तुझा डान्सही सगळ्यांनाच आवडतो. असा एखादा अभिनेता आहे का ज्याचा डान्स तुला खूप आवडतो? असा प्रश्न विचारण्यात आला यावंर अभिनेता म्हणाला की, ''मला अनेकांचे डान्स आवडतात. बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण चांगला डान्सर आहे. हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, वरुण धवन, शाहिद कपूर, हे सगळेच छान डान्स करतात. बरं, माझा विश्वास आहे की, डान्स हा नक्कीच एक प्लस पॉइंट आहे, मात्र चित्रपटासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डान्स नाही. डान्स हा चित्रपटाचा यूएसपी आहे, पण त्याचा आत्मा नाही. पण स्टारडममध्ये याची नक्कीच मदत होते''.