Pushpa फेम अल्लू अर्जुनचा पत्नीसोबतचा त्या रात्रीचा व्हिडिओ व्हायरल

या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या लूक आणि स्टाइलने लोकांना वेड लावले आहे.

Updated: Jan 6, 2022, 12:30 PM IST
 Pushpa फेम अल्लू अर्जुनचा पत्नीसोबतचा त्या रात्रीचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा: द राईज या चित्रपटातून लोकांच्या हृदयाची धडधड वाढवण्याचे काम करताना दिसत आहे. या चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. असे करत या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीनंतर पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाला होता. असे असूनही हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या लूक आणि स्टाइलने लोकांना वेड लावले आहे.

त्याची दाढी आणि पुष्पा बोलण्याचा अंदाज चाहत्यांना खूप आवडतो आहे. अल्लू अर्जुन प्रमाणेच त्याची पत्नी स्नेहा रेड्डी देखील तिच्या लुकसाठी विशेष चर्चेत असते.

अभिनेता अल्लू अर्जुन स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फोटो शेअर करत असतो. स्नेहा इतकी स्टायलिश दिसते की ती कोणत्याही हिरोईनला सहज मात देऊ शकते. 

 एका स्माईलने सर्वांचे मन जिंकले

अभिनेता अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याचा संबंध दिवाळीच्या पार्टीशी होता. व्हिडिओमध्ये दोन्ही कपल खूपच सुंदर दिसत होते, मात्र स्नेहाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिच्या  स्माईलने सर्वांची मनं जिंकली आहेत. दोघांच्या हा रात्रीच्या अंधारात दिवांच्या रांगेत चालताना व्हिडिओ सगळ्यांच लक्षवेधून घेत आहे. दोघेही अगदी रोमॅन्टिक अंदाजात या व्हिडिओत दिसत आहे. दोघांनी ट्रेडीशनल लुक करत लक्ष वेधलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुलगी अल्लू अरहासोबत फोटो शेअर

त्याचवेळी अभिनेता अल्लू अर्जुनने आणखी एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिची मुलगी अल्लू अरहा स्नेहासोबत दिसत होती. फोटोत अभिनेत्याची मुलगी स्नेहाला मिठी मारताना दिसत आहे.