'पुष्पा 2' च्या सेटवरून व्हायरल झाला क्लायमॅक्स फाइट सीन? Allu Arjun च्या चाहत्यांना बसला धक्का

Pushpa 2 Climax Scene Leaked Video :  'पुष्पा 2' च्या सेटवरचा क्लायमेक्स सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे

दिक्षा पाटील | Updated: Jul 31, 2024, 10:15 AM IST
'पुष्पा 2' च्या सेटवरून व्हायरल झाला क्लायमॅक्स फाइट सीन? Allu Arjun च्या चाहत्यांना बसला धक्का title=
(Photo Credit : Social Media)

Pushpa 2 Climax Scene Leaked Video : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना खूप वाईट वाटलं. या सगळ्यात आता चित्रपटातील क्लायमॅक्स फाइट सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर चाहत्यांना प्रचंड संताप आला आहे. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याची विनंती केली आहे. 

'पुष्पा 2' चा हा BTS व्हिडीओ आधीच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत कलाकार आणि क्री मेंबर्स क्लायमेक्स फाइट सीनसाठी शूट करताना दिसत आहेत. व्हिडीओत रक्तानं भरलेला एक व्यक्ती हार्नेस (केबल जिच्या मदतीनं त्यांना खाली-वर करतात किंवा हवेत उडत असल्याचं दाखवतात.)  तर इतर लोक हे सेटअपमध्ये मदत करत असल्याचं दाखवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रश्मिका आणि अल्लू अर्जुन या क्लिपमध्ये दिसत नाही आहेत. चित्रपटातील या मेकिंग सीनवर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

अनेक नेटकरी हा व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याची विनंती करत आहेत. कारण त्यांना सगळ्यांना हा सगळा सीन असो किंवा हा संपूर्ण चित्रपट फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचा आहे. एकानं कमेंट केली की 'कृपया व्हिडीओ काढून टाका. आमच्यासाठी क्लायमॅक्स खराब करू नका.' दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की 'अशा महत्त्वाच्या सीनला लीक करणं याचा अर्थ संपूर्ण टीमनं केलेल्या मेहनत व्यर्थ घालवणं असं आहे.'

दरम्यान, ही पहिली वेळ नाही, जेव्हा 'पुष्पा 2' चं फुटेज हे ऑनलाइक लीक झालं आहे. त्याच्याआधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात रश्मिका मंदाना ही लाल रंगाच्या साडीत दिसली. त्यात तिनं सिंदूर देखील लावला होता अर्थात सगळ्यांना रश्मिकाचा श्रीवल्ली लूक पाहायला मिळाला. सीक्वलमध्ये श्रीवल्लीचा लग्नानंतरचं आयुष्य पाहायला मिळणार आहे. ज्याला पाहण्यासाठी सगळेच प्रतीक्षेत आहेत. 

दरम्यान, आता हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी नाही तर 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं सगळं काम लवकरात लवकर संपण्यासाठी संपूर्ण टीम मेहनत करताना दिसते. तर हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचा पहिला भाग हा डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले होते.